आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Arrives In Amritsar To Resume Filming Of Lal Singh Chadha Offers Prayers At Golden Temple

'लाल सिंह चड्ढा'चे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यासाठी अमृतसरला पोहोचली करीना, सुवर्ण मंदिरात टेकला माथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चंदीगड येथे आहे. आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती  पुन्हा येथे आली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रेक घेऊन ती मुंबईत परतली होती. रविवारी पंजाबला आल्यानंतर सोमवारी तिने अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिरात माथा टेकला आणि शूटिंगला सुरुवात केली. करीनाची मॅनेजर टीममधील सदस्य नैना साहनी हिने करीनाच्या सुवर्ण मंदिराच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नैनाने एका फोटोला कॅप्शन दिले, "माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत आवडत्या गोल्डन टेम्पलमध्ये.... " एका फोटोत नैनादेखील करीनासोबत दिसतेय. फोटोत करीनाने ग्रे कलरचा कुर्ता परिधान केला असून तिच्या डोक्यावर ओढणी आहे. 

  • पुढील वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट...

'लाल सिंह चड्ढा' 1994 मध्ये आलेल्या 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गेल्याच महिन्यात आमिरने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले होते, "सत श्री अकाल जी... मैं लाल सिंह चड्ढा." अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.