आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : सैफ अली खान आणि करिना कपूर लाडका तैमूर अली खान बॉलीवूडमधील सर्वात पॉपुल स्टारकिड्स मधील एक आहे. मीडियाची नजर नेहमीच तैमूरवर टिकून असते. आता तर बाजारात तैमूरच्या नावाचे बिस्किट आले आहेत. यावरून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज येऊ शकतो. डीएनएच्या रिपोर्टनुसार कस्टमाइज बिस्किट तयार करणाऱ्या एका बेकरीत तैमूर बिस्कीट मिळत आहेत. या बेकरीने अलिकडेच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्टच्या स्वरूपात हेच बिस्कीट दिले होते. यापू्र्वीही तैमूरसारखे दिसणारी डॉल देखील मार्केटमध्ये आली होती.
> मार्केटमध्ये आलेल्या तैमूरच्या नावाच्या बिस्कीटावर आई करीनाने सध्या कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण मार्केटमध्ये तैमूर सारखी दिसणारी डॉल आल्यानंतर करीना आश्चर्यचकित झाली होती.
> करीना या डॉलला पाहून खुश झाली नव्हती. तिने त्यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, ती डॉल कोणत्याही प्रकारे तैमूरसारखी दिसत नाही. बेबोचे म्हणणे आहे की, ती डॉल हॉरर मूव्ही 'चाइल्ड्स प्ले'चे पात्र चकीशी मिळतीजुळती आहे. डॉलचे निळे डोळे आणि कुरळे केस आहे. त्यामुळे ती तैमूरसारखी दिसत नाही.
मुलाच्या सुरक्षेबाबत नेहमीच काळजीत असते करीना
काही दिवसांपूर्वी मुलाच्या सुरक्षेबाबत करीनाने एका चॅट शो मध्ये सांगितले होते की, 'आम्ही आमच्याकडून चांगला प्रयत्न करतोय. आम्ही त्याच्या बाहेर फिरण्यावर किंवा प्ले स्कूलमध्ये जाण्यावर बंदी आणू शकत नाही. पण बाहेर गेल्यावर त्याचा फोटो न काढण्याची फोटोग्राफर्सना विनंती करू शकतो.' फोटोग्राफर्सना रोखण्यासाठी आम्ही कोणती ब्लूप्रिंट तयार केली नाही पण आम्ही आमच्या स्तरावर मुलाची सुरक्षा करत असल्याचे करीनाने सांगितले.
इतकी आहे तैमूरच्या एका फोटोची किंमत
सैफ अली खानने 'कॉफी विथ करण' मध्ये सांगितले की, तैमूरचा एक फोटो 1500 रुपयांमध्ये विकला जातो. सैफच्यामते एखाद्या सुपरस्टारच्या फोटोची पण एवढी किंमत नाहीये. तैमूरच्या क्यूटनेसमुळे त्याचा फोटो इतक्या महाग विकला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.