आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये दिसू शकतात अर्जुन-करिना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क:  सिक्वेलच्या या काळात प्रेक्षकांना लवकरच आणखी एक हिट सिक्वेल पाहायला मिळू शकतो. दिग्दर्शक अनुराग बसू आपल्या 'लाइफ इन अ मेट्रो' चित्रपटाचा सिक्वेल आणण्याची तयारी करत आहेत. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. आत 11 वर्षानंतर याच्या सिक्वेलची तयारी करत आहेत. अनुरागने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. ते स्वत: याची निर्मिती आणि दिग्दर्शन करतील. 

 

एका रिपोर्टच्या मते, या चित्रपटात ते करिना कपूर खान आणि अर्जुन कपूरला घेणार आहेत. या सिक्वेलमध्येदेखील ओरिजनल चित्रपटासारखे अनेक वेगवेगळ्या कथा असतील. यात करिना एखाद्या कथेत मुख्य भूमिका करू शकते. याकथेपैकी एका कथेत अर्जून कपूरदेखील दिसू शकतो. मात्र दोघे एकाच कथेत दिसणार नाहीत. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रंॅचायझीच्या पहिल्या भागात 4 कथा दाखवण्यात आल्या होत. सिक्वेलमध्येदेखील असे काही दिसण्याची शक्यता आहे. 


अनुरागला नुकतेच निर्माते बोनी कपूर यांनी अजय देवगण स्टारर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी या चित्रपटामुळे अजयच्या चित्रपटात रस घेतला नाही. या चित्रपटातदेखील इतर चित्रपटांप्रमाणे अनुरागचा आवाडता संगीतकार प्रीतमच संगीत देऊ शकतो. करिना कपूरला 'वीरे दी वेडिंग' चित्रपटानंतर चांगले ऑफर मिळू लागले आहेत. ती लवकरच करण जोहरच्या मल्टिस्टारार तख्त चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार स्टारर 'गुड न्यूज'मध्येदेखील दिसणार आहे. तर अर्जुनजवळ सध्या 'पानीपत' आणि 'इंडियाज मोस्ट वांटेड' सारखे चित्रपट आहेत. या व्यतिरिक्त त्याच्याकडे 'नमस्ते इंग्लैंड' आहे आणि 'संदीप और पिंकी फरार' लवकरच प्रदर्शित होईल. 

बातम्या आणखी आहेत...