सैफीनाने केपटाउनमध्ये साजरा / सैफीनाने केपटाउनमध्ये साजरा केला तैमूरचा दुसरा बर्थडे, आईवडिलांसोबत धमाल करताना दिसला चिमुकला

बेस्ट फ्रेंडसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसला तैमूर, व्हायरल झाला टिम टिमचा अनसीन Video

Dec 22,2018 11:50:00 AM IST


मुंबईः करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांचा मुलगा तैमूरचा दुसरा वाढदिवस (20 डिसेंबर) केपटाउन, साऊथ आफ्रिकेत साजरा केला. तैमूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज समोर आले आहे, यापैकी एका फोटोत तैमूर चीज केक कापताना दिसतोय. ब्लू डेनिम जॅकेट आणि रेड पायजामात बर्थडे बॉय अतिशय क्युट दिसतोय. समोर आलेल्या आणखी एका फोटोत तैमूर आई करीनासोबत पोज देताना दिसतोय. करीना गेल्या काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने साऊथ आफ्रिकेत आहे. त्यामुळे सैफ आणि करीनाने मुलाचा वाढदिवस येथेच साजरा करण्याचा निर्णय घेतला.


समोर आला तैमूरचा अनसीन व्हिडिओ...
- तैमूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची बेस्ट फ्रेंड कायनाथची आई प्रियांका बोहरा (अभिनेता रणविजय सिंहची पत्नी) ने एक अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तैमूर कायनाथसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसतोय. दोन्ही चिमुकले या व्हिडिओत अतिशय क्यूट दिसत आहेत.


- करीनाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे ती सध्या राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' या चित्रपटात काम करत आहे. यामध्ये अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सैफ नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या दुस-या सीझनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.


चित्रपटाचे नाव असेल 'तैमूर'
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे जे नाव रजिस्टर्ड केले आहे, ते नाव आहे 'तैमूर'. या चित्रपटात तैमूर अली खानविषयी दाखवले जाणार आहे, की कथानक दुसरे काही असेल, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.


- दोन वर्षांचा तैमूर सर्वाधिक प्रसिद्धीझोतात असलेल्या भारतीय पर्सनॅलिटीच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत त्याने 10 वे स्थान पटकावले आहे.

X