आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kareena kapoor : मुलगा तैमूरसाठी केयरलेस आई म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली करिना कपूर, म्हणाली - 'तुमच्यासारख्या लोकांना मी माझ्या मनात एक बोट दाखवते'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : करिना कपूरवर नेहमीच मुलगा तैमूरच्या बाबतीत केयरलेस आई असल्याचा आरोप केला जातो. सोशल मीडिया यूजर्स नेहमी यासाठी तिला ट्रोल करतात. आता करिनाने आपला रेडिओ शो 'व्हॉट वूमन वॉण्टस' द्वारे अशा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तिच्या शोमध्ये नणंद सोहा अली खान गेस्ट म्हणून आली होती. त्यादरम्यान तिने आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले आणि ट्रोलर्सला उत्तर दिले.  

 

काय म्हणाली करिना कपूर...
- करिना म्हणाली, "मी एक सांगू इच्छिते. अशातच मला अनेक फोटोजसाठी ट्रोल केले गेले, ज्यामध्ये मी एका प्रायव्हेट जेटमध्ये बसलेली दिसत होते. ट्रोलर्सने मला केयरलेस आई म्हणत लिहिले की, माझ्या मुलाला नॅनी सांभाळत आहे. माझ्या आयुअश्याबद्दल काहीही माहिती न असणाऱ्या तुमच्यासारख्या जजमेंटल लोकांना मी माझ्या मनात एक बोट दाखवते". प्रेग्नन्सीमध्ये करिनाने शेवटच्या महिन्यापर्यंत काम केले होते आणि मुलाला जन्म दिल्यांनतर दोन महिन्यांनी परत कामासाठी सज्ज झाली होती. जेव्हा तैमूर काही महिन्यांचेच होता, तेव्हाही ती त्याला घरी सोडून अनेकदा शूटसाठी निघून जायची. 

 

तैमूरला काही क्षणांसाठीही सोडू इच्छित नाही सैफ... 
- करिनाने यादरम्यान तैमूर आणि डॅडी साईविषयीही सविस्तर सांगितले. ती म्हणाली, "मुलासाठी तो खूप वेडा आहे. मला त्याला;या बाहेर ढकलावे लागते. तो भुज (गुजरात) ला चालला होता शूटसाठी आणि म्हणत होता,  'नाही नाही...शूट कॅन्सल करा...मी नाही जाऊ शकत. मी तैमूरला सोडू शकत नाही'. मी म्हणाले, 'तुला जावे लागेल. काम करावे लागेल'. मी त्याला म्हणते, 'कधी कधी मलाही तुझ्यासोबत एकटे राहावे लागते"

बातम्या आणखी आहेत...