आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Got Surprise Party By Parents And Sister Karishma & Husband Saif Present Special Birthday Cake

Inside Photos: रात्री 12 वाजता सेलिब्रेट झाला करीनाचा बर्थडे, सैफने मागवला खास केक, सासू शर्मिला होती गैरहजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आज (21 सप्टेंबर) 38 वर्षांची झाली आहे. बेबोने यंदाचा आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला. रात्री 12 वाजता करीनाची आई बबिता, वडील रणधीर, बहीण करिश्मा आणि काका कुणाल कपूर यांनी करीनाच्या घरी पोहोचून तिला सरप्राइज दिले. तर सासरच्या मंडळींमधून तिची नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. पती सैफने करीनासाठी स्पेशल केक मागवला होता. त्याचा फोटो सोहा-करिश्माने सोशल मीडियावर शेअर केला आहे. केकवर स्पेशल लिहिण्यात आले होते, "यू आर ऑर रॉकस्‍टार" 2000 मध्ये 'रिफ्यूजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू आणि 2012 मध्ये अभिनेता सैफसोबत लग्न थाटणा-या करीनाच्या या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तिच्या सासूबाई शर्मिला टागोर आणि बेस्ट फ्रेंड्स मलायका आणि अृता अरोरा गैरहजर होत्या.


करीनाने बर्थडे पार्टीत परिधान केले 40 हजारांचे टी-शर्ट...
करीनाने या  सरप्राइज पार्टीत Gucci ब्रॅण्डचा व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स आणि डायमंड विथ सिल्वर प्लेटेड वॉच घातली होती. तिच्या टी-शर्टवर लिहिले होते, "Someone saved my life tonight Elton John." 
- करीनाचे हे टी-शर्ट दिसायला अगदी सिंपल होते, पण त्याची किंमत 550 डॉलर अर्थातच 40,000 रु. होती.  सोशल मीडियावर करीनाचे फॅन्स आणि मित्र तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
- याचवर्षी करीनाने एकता कपूरच्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातून कमबॅक केले आहे. करण जोहरचा 'तख्‍त' आणि 'गुड न्‍यूज' हे करीनाचे आगामी चित्रपट आहेत.

 

लग्झरिअस लाइफ जगते करीना...

- नेटवर्दियरनुसार, करीना 10 मिलियन डॉलर अर्थातच 72 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी, मर्सिडीज, BMW, रेंज रोवर आणि लेक्सस या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. तिच्याजवळ सुमारे 14 कोटी रुपये किंमतीच्या या आलिशान गाड्या आहेत.
- करीना एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये मानधन घेते. 2010 मध्ये करीनाने स्वतःसाठी 7 कॅरेटची हि-याची अंगठी घेतली होती, त्याची किंमत तब्बल 72 लाख रुपये होती. एका मुलाखतीत करीनाने खुलासा केला होता की, एका एस्ट्रोलॉजरच्या सांगण्यावरुन तिने हीरा बोटात घातला आहे. 2012 मध्येही सैफने करीनाला 5 कॅरेटची हि-याची अंगठी गिफ्ट केली होती.
- 'हीरोइन' (2012) या चित्रपटात करीना कपूरने 130 डिझायनर कपडे परिधान केले होते. हे सर्व कपडे मनीष मल्होत्राने डिझाइन केले होते. तिने परिधान केलेल्या डिझायनर साड्यांची किंमत दीड कोटी रुपये होती. चित्रपटासाठी करीनाने सहावर्षांपूर्वी 80 लाख रुपये चार्ज केले होके.
- करीना विविध प्रकारच्या बूट्सची आवड आहे. तिच्या कलेक्शनमध्ये 100 हून अधिक बुट्स आहेत. करीनाला हॅण्डबॅग्सचीही विशेष आवड आहे. तिच्या बॅग्सचे आवडते ब्रॅण्ड्स Jimmy Choo, Camio Clutch, Tod's d Bag हे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...