आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor, Irrfan Khan Angrezi Medium And Ranveer Singh Jayeshbhai Jordaar First Look Viral Photos

'अंग्रेजी मीडियम'मधील करीना-इरफान आणि 'जयेश भाई जोरदार'मधील रणवीर सिंगची छायाचित्रे आली समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अंग्रेजी मीडियम'तील करीना आणि इरफानचे हे छायाचित्र व्हायरल होत आहे. - Divya Marathi
'अंग्रेजी मीडियम'तील करीना आणि इरफानचे हे छायाचित्र व्हायरल होत आहे.

बॉलिवूड डेस्कः नवीन वर्षासोबतच अनेक चित्रपटांचे फर्स्ट लूक, पोस्टर्स आणि कलाकारांचा लूक समोर आला आहे. त्याचबरोबर काही छायाचित्रे व्हायरलही झाली आहेत जी चित्रपटाच्या सेटशी संबंधित आहेत. 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाच्या सेटवरील छायाचित्रात करीना कपूर खान आणि इरफान खान एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर रणवीर सिंग, ईशान खट्टर-अनन्या पांडे आणि रुही अफजाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

एका फ्रेममध्ये करीना-इरफान: 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट 'हिंदी मीडियम'चा सिक्वेल आहे, जो मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात राधिका मदन देखील दिसणार आहे. पंकज त्रिपाठीही या चित्रपटात एक कॅमिओ करणार आहेत. चित्रपटात इरफान एका मिठाईच्या दुकानाच्या मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटांच्या सेटवरचेही फर्स्ट लूक आले समोर : ईशान खट्टर-अनन्या पांडे यांच्या 'खाली-पीली' चित्रपटातील दोन्ही स्टार्सचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  ज्यामध्ये हे दोघेही टॅक्सीमध्ये बसलेले दिसत आहेत. दुसरीकडे जान्हवी कपूर, राजकुमार आणि वरुणचा लूकही समोर आला आहे. यात तिघेही अतिशय घाबरलेले दिसत आहेत.  हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. हा चित्रपट मार्चमध्ये 'अंग्रेजी मीडियम'सोबत प्रदर्शित होईल.
 

बातम्या आणखी आहेत...