• Home
  • News
  • Kareena Kapoor look from 'Lal Singh Chadhdha' and Fatima Sana Shaikh look from 'Suraj Pe Mangal Bhari' revealed

फर्स्ट लुक / 'लाल सिंह चड्‌ढा' मधून करिना कपूर आणि 'सूरज पे मंगल भारी' मधून फातिमा सना शेखची झलक आली समोर

ख्रिसमसला रिलीज होणार आहे आमिर-करिनाचा चित्रपट 'लाल सिंह चड्‌ढा'
 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 12:41:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्‌ढा' मधून करिना कपूरचा फर्स्ट लूक रिव्हील केला गेला आहे. व्हॅलेन्टाईन डेला करिनाचे पोस्टर शेअर करत आमिर खानने आपली एक विशेष इच्छादेखील व्यक्त केली. तो म्हणतो प्रत्येक चित्रपटात करिनासोबत रोमान्स करू इच्छितो आणि ही त्याची स्वभाविक इच्छा आहे. 'लाल सिंह चड्‌ढा' ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

संपूर्ण भारतात होत आहे शूटिंग...


या पोस्टरसोबत आमिरने एक लाइन लिहिली आहे, "पा लेने की बेचैनी, और खो देने का डर... बस इतना सा है, ज़िंदगी का सफर." आमिरचा हा चित्रपट 'द फॉरेस्ट गम्प' चा रीमेक आहे. ज्यामध्ये आमिर खानने अनेक लूक कॅरी केले आहेत. करिना चित्रपटात आमिरची लव्ह इंटरेस्ट म्हणून दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग संपूर्ण भारतात होत आहे.


फातिमा सना शेखचा लुकदेखील रिव्हील...


दुसरीकडे मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ यांचा चित्रपट 'सूरज पे मंगल भारी' मधून फातिमा सना शेखचा लुक समोर आला आहे. ती लाल साडीमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत, तर याचे प्रोडक्शन झी स्टुडिओजने केले आहे. लूक शेअर करत फातिमाने लिहिले, "ही मराठी मुलगी पडेल सर्वांवर भारी..."

X
COMMENT