आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आता तर त्याच्या सारख्या दिसणा-या डॉल्सही बाजारात आल्या आहेत. यावर करीना आणि सैफ म्हणाले की, तैमूरवर लोक किती प्रेम करतात, हे त्याच्या मार्केटमध्ये आलेल्या डॉल्सवरुन कळते. केरळच्या बाजारात तैमूर नावाच्या डॉल्स आल्या आहेत. या डॉल व्हाइट कुर्ता, नेव्ही ब्लू नेहरु जॅकेट आणि ब्लू पँटमध्ये आहेत, हुबेहूब तैमूरसारख्या दिसतात. या डॉल पाहून तैमूरचे वडील सैफ म्हणाले की, "मला वाटते की, मुलाचे नाव मला ट्रेडमार्क करुन घ्यावे लागेल. तैमूरमुळे लोकांना फायदा होत आहे, याचा मला आऩंद आहे. पण कमीत कमी मला एक डॉल तर पाठवूच शकतात. मी देवाकडे फक्त त्याच्या सुरक्षेची आणि आनंदाची मागणी करतो"
तैमूरविषयी टेंशनमध्ये आहे करीना
- करीनाला तिच्या मुलाला चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे आनंदी आहे. पण तैमूरविषयी तिला चिंता वाटते. करीनाला ती आरजे बनलेली असताना एका कार्यक्रमात याविषयी विचारण्यात आले. ती म्हणाली की, "काहीही केले तरी तैमूर प्रसिध्दीपासून दूर पळू शकत नाही आणि आम्हीही पळू शकत नाही."
-"मी डॉल पाहिली तर मी चकीत झाले, काय बोलावे हे मला कळाले नाही, पण सैफ म्हणाला की, लोक त्याच्यावर खुप प्रेम करतात आणि अशा गोष्टी त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. तसे पाहिले तर आमचा मुलगा तैमूरविषयी लोकांच्या मनात खुप प्रेम आहे. आम्ही त्याचे फोटो क्लिक करण्यापासून आणि डॉल बनवण्यापासून लोकांना रोखले तर हे चुकीचे ठरेल."
- "आम्ही मीडियाला काहीच न म्हणता, त्याला नॉर्मल आयुष्य देण्याचे काम करत राहू. कारण एका पॉइंटला या गोष्टी खुप त्रास देतात. हे तैमूरसाठी जेवठे कठीण असेल, तेवढेच कठीण माझ्या आणि सैफसाठी असणार आहे."
- तैमूर 20 डिसेंबरला 2 वर्षांचा होईल. त्याचा हा बर्थडे पटौदी पॅलेसमध्ये साजरा केला जाईल.
एवढी आहे तैमूरच्या एका फोटोची किंमत
- सैफ अली खानने नुकतेच 'कॉफी विद करण'मध्ये सांगितले की, त्याच्या आणि करीनाच्या 23 महिन्यांच्या मुलाच्या एका फोटोची किंमत 1500 रुपयांमध्ये विकतो.
- सैफ म्हणतो की, एवढी किंमत कोणत्या सुपरस्टारलाही मिळत नाही. तैमूरच्या क्टूटनेसमुळे त्याचा फोटो एवढा महागडा विकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.