आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Pilates Exercise Is Her Beauty Secret Workout Video With Girls Gang

व्हायरल होत आहे करीना कपूरचा वर्कआउट व्हिडिओ, गर्ल गँगसोबत जिममध्ये गाळतेय घाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री करीना कपूर आपल्या फिटनेसविषयी किती जागरुक आहे, हे तिच्या चाहत्यांना ठाऊकच आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ तिची ट्रेनर नम्रता पुरोहित हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत करीनासह मलायका  अरोरासुद्धा दिसत आहे. दोघीही जिममध्ये घाम गाळत आहेत. करीना तिचा वर्कआउट कधीही मिस करत नाही.

 

परफेक्ट आहे करीनाचा बॉडी शेप... 

करीना पिलाटे एक्सरसाइज करणे पसंत करते. पिलाटे एक्सरसाइज शरीराला फ्लेक्सिबल बनवते आणि मसल्स मजबूत करण्याचे काम करते. सोबतच ही एक्सरसाइज अनेक आजारांपासून मुक्तता करते.  कमी केले होते 16 किलो वजन करीना कपूरने मुलगा तैमूरच्या जन्मानंतर झपाट्याने वाढलेले वजन कमी केले होते. डिसेंबर 2017 मध्ये प्रेग्नेंसीनंतर तिने योग क्लास सुरु केला होता. सोबतच पिलाटे एक्सरसाइजही सुरु केली होती. एका रिपोर्टनुसार, या एक्सरसाइजमुळे करीनाने अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 16 किलो वजन कमी केले होते. प्रेग्नेंसीनंतर करीनासाठी ट्रेडमिलवर चालणे कठीण झाले होते. त्यामुळे तिने वॉक सुरु केला होता. ती दररोज 20 ते 30 मिनिटे वॉकिंग करायची.

 

केली नाही क्रेश डाइटिंग

करीना खाण्यापासून जास्तवेळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे तिने डाएटपेक्षा वर्कआउटवर जास्त भर दिला. करीनाची ट्रेनर नम्रता पुरोहितने एका मुलाखतीत सांगितले होते, की करीनाने क्रेश डाइटिंगऐवजी सेंसिबल आणि स्लो प्रोसेस फॉलो केली. नम्रताने सांगितले की, करीना आठवड्यातून तीन ते चार दिवस पिलाटे एक्सरसाइज करते. हे 45 मिनिटांचे सेशन असते. सोबतच ती फुल बॉडी वर्कआउट करते. यामध्ये कार्डिलेक, लेटर बेरल आणि जम्प बोर्डचा समावेश असतो.  नम्रताने सांगितले की, करीना दर दिवशी विविध एक्सरसाइज करते, जेणेकरुन व्यायामाची आवड कायम राहावी. 

 

9 वर्षांनंतर अक्षयसोबत स्क्रिन शेअर करणार करीना...

'वीरे दी वेडिंग'नंतर करीना अक्षय कुमारसोबत आता 'गुड न्यूज'मध्ये झळकणार आहे. चित्रपटात दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट 19 जुलै, 2019 रोजी रिलीज होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...