आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाने सैफसोबत लग्नासाठी दोनदा दिला होता नकार, हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. दोघांना तैमूर अली खान नावाचा मुलगा देखील आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींमध्ये या दोघांचे नाव घेतले जाते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनी करीनाने तिच्या लग्नाबाबत आश्चर्यकारक माहिती दिली आहे. तब्बल दोनदा करीनाने सैफला लग्नाला नकार दिला. पण जेव्हा तिस-यांदा सैफने लग्नाची मागणी घातली तेव्हा ती नाही म्हणू शकली नाही. 

  • काय सांगितले करीनाने...

मुलाखतीत करीना कपूरने सांगितले, “सैफने मला दोन वेळा सांगितले की आपल्याला लग्न करायला हवं. पहिल्यांदा त्याने ही गोष्ट ग्रीसमध्ये असताना सांगितली. त्यानंतर लद्दाखला असताना पुन्हा एकदा विचारले. त्यावेळी माझी भूमिका ‘मला माहिती नाही’ अशी होती. कारण मी त्याला पूर्णतः ओळखत नव्हती. त्यामुळे मला काही कळतच नव्हते. मी खूप संभ्रमात होते. यामुळे तेव्हा मी त्याला नकार दिला. हा नकार त्याला अजून चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी होता. मी या लग्नाला माझ्या आयुष्यातील चांगला निर्णय समजते.

  • सैफ-करीनाने केले होते कोर्ट मॅरेज

करीनाने मुलाखतीत सांगितले होते- 'लोकांना आमच्या लग्नाविषयी लहानातील लाहान गोष्ट जाणुन घ्यायची होती. आम्ही कोर्ट मॅरेज केले आणि छतावर येऊन मीडियाला हॅलो बोललो.' - लग्नापुर्वी करीना-सैफ लिव्ह-इनमध्ये राहिले आणि पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विवाहबंधनात अडकले. - एका मुलाखतीत करीना म्हणाली होती की- 'मी सैफला माझा लाइफ पार्टनर निवडले होते, कारण मला एक सेल्फ डिपेंडेट वुमनप्रमाणे राहायचे होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते. सैफने माझी ही गोष्ट मान्य केली होती.'

  • सैफच्या पहिले शाहिदसोबत होते अफेअर

सैफसोबत लग्न करण्यापुर्वी करीना शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2007 च्या काळात शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना आणि सैफची जवळीक वाढली. 'ओमकारा' या चित्रपटात सैफ आणि करीनाला खुप कमी सीन एकत्र शूट करायचे होते. तरीही दोघं सेटवर जास्त काळ एकत्र दिसायचे. 'ओमकारा'नंतर सैफ-करीनाची जवळीक 'टशन'च्या शूटिंग दरम्यान दिसली. - शूटिंगमधून वेळ काढून दोघं लाँग वॉकवर जायचे. दोघांच्या अफेअरच्या बातम्या पसरल्या. पण दोघांनी नाते स्विकारले नव्हते. तर लॅक्मे फॅशन वीक दरम्यान सैफ-करीना पहिल्यांदा एकाच गाडीतून आले होते. येथे पहिल्यांदा सैफने मान्य केले होते की, तो करीनाला डेट करतोय.  

बातम्या आणखी आहेत...