करिना कपूर म्हणाली - 'सैफला वाटते की, मी तैमूरला बिघडवते आहे....'

एका कारणाने तैमूरसाठी करिनाला वाटते भीती म्हणाली - हे खरच खूप भयावह आहे... 
 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 25,2019 11:11:00 AM IST

मुंबई : करिना कपूरने सांगितल्यानुसार, सैफला वत्तेब की, ती मुलगा तैमूरला बिघडवत आहे. बेबोने हे अशातच दिलेल्या एका इंटरव्यूदरम्यान सांगितले. करिना म्हणानी त्यानुसार, सैफ असे कदाचित यामुळे म्हणतो कारण त्याच्याकडे मुलांना सांभाळण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा अनुभव जास्त आहे. करिनाच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की, दोघांपैकी सैफ तैमूरसाठी जास्त डिसीप्लिन्ड आहे, पण करिना मात्र त्याला जास्तच लाड प्रेम करते.

सैफ तैमूरला जास्त वेळ देत आहेत...
करिनाने इंटरव्यूमध्ये सांगितले, "सैफनुसार, मी तैमूरला बिघडवत आहे. तो म्हणतो की, तुला काळात नाही त्याला कडे धाकात ठेवायचे. निश्चितपणे सैफ म्हंतो तू हे करू नको, तू हे केले पाहिजेस. पण त्याच्याकडे जास्त अनुभव आहे. तो त्याचे कर्तव्य उत्तमपणे निभावतो, कारण तो तैमूरला आपला जास्तवेळ देत आहे आणि तो जे काही करू शकतो, ते सर्व तो करतो आहे. पण एक आई म्हणून मी त्याला Kiss करते आणि लाड करते. सैफ म्हणतो, 'तू त्याला खूप Kiss करते, खूप जास्त लाड करते. पण मी हे असे कधीपर्यंत कारेन, मला नाही माहित."

तो खूप नॉटी आहे : करीना...
मुलगा तैमूरबद्दल करिना पुढे म्हणाली, "तो खूप आगाऊ आहे, नटखट आहे. तो बिलकुल आपल्या वडिलांसारखा आहे. तो आता त्या वेळेतून जात आहे, जिथे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट 'मम्मा हसू नको', 'मम्मा पकडू नको', तुम्ही काही करत असाल तर, 'मम्मा असे करू नका' कारण आम्हीदेखील त्याला म्हणतो. तैमूर असे करू नको. तो या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तसेच बोलतो. मात्र आम्हाला नाही वाटत की, तैमूरचे असे फॅन फॉलोइंग असताना त्याला लाइमलाइटपासून दूर ठेवणे सैफीनासाठी सोपा टास्क असेल."

करिना म्हणाली - 'तैमूरच्या मागचे पेपराजी पाहून भीती वाटते...
करिनाने इंटरव्यूमध्ये सांगितले की, तिला तेव्हा भीती वाटते, जेव्हा ती पहाते की, मीडिया प्रत्येक ठिकाणी तैमूरला ट्रॅक करत आहे. तिच्यानुसार, तिची इच्छा नाही की, प्रत्येक ठिकाणी पेपराजीने तैमूरचे फोटो क्लिक करावे. करिना म्हणाली, "पेरेंट्स म्हणून आम्ही तैमूरला सामान्य आयुष्य देऊ शकतो की, त्याने घराबाहेर जाऊन खेळावे, रस्तावर मुक्तपणे फिरावे. पेपराजीने दुसरा कुणाचे फोटो काढावे. रणवीर सिंहचे फोटोज क्लिक करावे." जेव्हा करिनाला विचारले गेले की, पेपराजीमुळे तिला कसा त्रास होतो. उत्तरात ती म्हणाली, "मुले शेवटी मुले असतात आणि कुणाच्या मुलाचा पाठलाग कुणी करत नाही. आम्हाला काजी वाटते आणि हे सर्वांना कळाले पाहिजे." करिना म्हणाल्यानुसार, अनेकदा जेव्हा मी शूटवर असते. तेव्हा मीडियामध्ये आलेले फोटो पाहून कळते कि तैमूर काय करत आहे. हे खरंच खूप भयानक सत्य आहे."

X
COMMENT