आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई/ ग्रॅज्यूएशन पुर्ण न केल्याचे करीनाला आहे दुःख, म्हणाली - तैमूरला पुर्ण करावे लागेल शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. ग्रॅज्यूएशन पुर्ण न करताच करीना कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याचे दुःख करीना कपूरच्या मनात अजूनही आहे. करीनाने आपल्या रेडियो शो व्हॉट वुमन वॉन्टमध्ये याचा खुलासा केला. शोमध्ये करीना म्हणाली की, मला नेहमी वाटते की, मी माझे करिअर थोडे उशीरा स्टार्ट करायला हवे होते. मी खुप क्विक डिसीजन घेतला आणि वयाच्या 17 वर्षीच शूटिंग करण्यास सुरुवात केली, पण आता मला वाटते की, मी शिक्षण पुर्ण करायला हवे होते. 

 

तैमूरची जी इच्छा असेल तेच तो करेल 
शोमध्ये करीना म्हणाली की, आजच्या काळात शिक्षण खुप गरजेचे आहे. कमीत कमी माझ्याजवळ डिग्री तरी असायला हवी होती. यानंतर मी अॅक्टिंग वगैरे करायला हवी होती. ती म्हणाली की, आता या सर्व गोष्टी मला कळतात. मी तैमूरला त्याचे पुर्ण शिक्षण पुर्ण करायला लावेल. यानंतर त्याची जी इच्छा असेल ते त्याने करावे. 

 

सैफचे कुटूंब खुप एज्यूकेटेड 
करीना म्हणाली की, सैफचे कुटूंब आणि फ्रेंड्स खुप शिकलेले आहेत. जास्तीत ऑक्सफोर्ड, कॅम्ब्रिज आणि विनचेस्टरमध्ये शिकले आहेत. सैफ अॅकेडेमिक्समध्ये खुप अॅक्टिव्ह आहे. त्याने सारा आणि इब्राहिमच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवले आणि आता ते तैमूरकडेही तसेच लक्ष ठेवणार आहेत. करीना म्हणाली की, चित्रपटांमध्ये जास्त अॅक्टिव्ह असणा-या कुटंबामधून मी आले आहे. पण मला आता वाटते की, आयुष्यात यापेक्षाही महत्त्वाच्या अनेक गोष्टी असतात. आता मी ट्रॅव्हल करते, विविध लोकांना भेटते आणि नवनवीन गोष्टी शिकते. मला वाटते की, माझ्या मुलाने सर्व काही शिकावे. 

 

तैमूरचा वाढदिवस साजरा करुन परतली 
- करीना आणि सैफ हे नुकतेच तैमूरचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करुन परतले आहेत. त्यांनी तैमूरचा वाढदिवस दक्षिण अफ्रिकेत साजरा केला. 
- करीनाचे शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमध्ये झाले. तिने मीठीबाई कॉलेजमधून 2 वर्षे कॉमर्सचे शिक्षण घेतले. यासोबतच तिने हार्वडमध्ये 3 महिने मायक्रो कॉम्प्यूटर समर कोर्टमध्ये अॅडमिशन घेतले होते, पम काही कारणांमुळे तिने ते मध्येच सोडले. 

बातम्या आणखी आहेत...