आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Says After 20 Years In Cinema, I Was Born For Acting, I Will Enjoy It Till The End.

सिनेसृष्टीत 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त करिना कपूर म्हणते - 'अभिनयासाठीच झाला माझा जन्म, शेवटपर्यंत त्यातच रमणार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिनेसृष्टीत २० वर्षांचा माझा प्रवास खूपच चांगला राहिला. यादरम्यान मी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. मी फक्त अभिनय करण्यासाठीच जन्माला आले आहे, असे मला वाटते. मी मरेपर्यंत अभिनय करू शकते, याचा मला आत्मविश्वास आहे. आतापर्यंत मी जितक्या चित्रपटांत काम केले ते सर्व माझे आवडते आहेत. यातील एखाद्या चित्रपटाला मी माझा फेव्हरेट म्हणू शकत नाही, कारण मी आज जे आहे, ते एखाद्या चित्रपटामुळे नव्हे तर सर्वच चित्रपटांमुळे आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटामुळे मी मोठी झाले नाही तर मोठी होण्यामागे फ्लॉप चित्रपटांचादेखील तितकाच वाटा आहे.

आमिरसोबत पुन्हा काम करणे स्वप्नासारखे
'लालसिंह चड्ढा' हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटावर मी नंतर बोलेल. परंतु आमिर खानसोबत मला पुन्हा काम करायला मिळते. हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मी नेहमी आमिरची फॅन राहिली आहे. ते एक सिनेसृष्टीतील प्रतिभावंत कलावंत आहेत.

आधुनिक विवाहपद्धतीवर बोलणार सैफ
करिना लवकरच आपला चॅट शो 'व्हाॅट वुमन वाँट'चा दुसरा सीझन घेऊन येणार आहे. या शोमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून तिचे पती सैफ आणि सासू शर्मिला टागोर दिसणार आहेत. करिना म्हणते, सैफ माझ्या शोमध्ये येणार आहे. मॉडर्न मॅरेज या विषयावर बोलणार आहे. मला वाटते की, चांगल्या विषयामुळे आमचा पहिला सीझन खूप यशस्वी राहिला. यानंतरही आमच्याकडे काही खास पाहुण्यांची यादी आहे.