आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Paid Taimur Caretaker Naini In Lack, Naini Fees Not Less Than MBA And IT Professionals

करीनाच्या मुलाचा सांभाळ करणा-या आयाला मिळते एवढी सॅलरी, आकडा ऐकून एमबीए आणि आयटी प्रोफेशनल्स होतील दंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः तैमूर अली खान बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा त्याची केअर टेकर असलेल्या आयासोबत कधी प्ले स्कूल तर कधी प्ले ग्राऊंडमध्ये दिसत असतो. आईवडिलांपेक्षा तैमूर त्याच्या आयासोबतच जास्त वेळ घालवत असतो. तैमूरच्या आयाचे नाव सावित्री असून तिच्या पगाराचा आकडा ऐकून तुमचे होश उडतील. सावित्रीचा पगार एखाद्या एमबीए आणि आयटी प्रोफेशनल्स असलेल्या व्यक्तीएवढा आहे. रिपोर्टनुसार, तैमूरच्या आयाचा मासिक पगार हा तब्बल दीड लाख रुपये आहे. जर आयाला एक्स्ट्रा काम करावे लागले, तर हा आकडा 1.75 लाखांपर्यंत जातो. तैमूर 21 महिन्यांचा असून 20 डिसेंबर 2016 रोजी त्याचा जन्म झाला. 


आयाला देण्यात आली कार..  
- सॅलरीव्यतिरिक्त आयाला करीनाने एक कार दिली आहे, ज्यातून ती तैमूरला वांद्रा परिसरात किंवा नातेवाईकांच्या घरी घेऊन जाऊ शकते.
- इतकेच नाही तर जेव्हा सैफ आणि करीना परदेशी फिरायला जातात, तेव्हा तैमूरचा सांभाळ करण्यासाठी त्याची आयादेखील त्यांच्यासोबत जात असते. तैमूरसाठी आयाची निवड जुहूस्थित एका एजन्सीच्या मार्फत झाली आहे.
- तुषार कपूर आणि सोहा अली खान यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठीही आयांची निवड करण्यात आली असून हीच एजन्सी त्यासाठी काम करते. यासाठी आयाचे बॅकग्राऊंड, मेडिकल आणि फायनॅन्शिअल व्हेरिफिकेशन केले जाते.

 

करीना करणार आहे दुस-या बाळाचे प्लानिंग...

- काही दिवसांपूर्वीच करीना तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहाटांच्या "Starry Nights 2.Oh!" या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये करीनाने लवकरच दुस-या बाळाचे प्लानिंग करणार असल्याचा खुलासा केला.
- पुढच्या दोन वर्षांत दुस-या बाळाचे प्लानिंग करणार असल्याचे करीनाने यावेळी सांगितले.

- पहिल्या प्रेग्नेंसीच्या काळात करीना आपल्या फॅशनेबल लूकमुळे ट्रेंड सेटर बनली होती. करीनाने प्रेग्नेंसीच्या काळातही काम सुरु ठेवले होते.  तिने बेबी बंपसोबत रॅम्प वॉकही केला होता. 

बातम्या आणखी आहेत...