आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, अक्षय कुमार, दिलजीत दोसांज आणि किआरा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 नोव्हेंबर) रिलीज झाला. ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. पण या इव्हेंटमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते करीना कपूर खान हिने. लाइट यलो ड्रेसमध्ये करीना अतिशय सुंदर दिसली. सिंपल मेकअप, न्यूड लिपस्टीक आणि मोकळ्या केसांमध्ये करीना अतिशय आकर्षक दिसली. करीनाने तिचे या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो बघून वॉव हेच शब्द प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडतील.
हा चित्रपट आयव्हीएफ टेक्नॉलॉजीने होणा-या प्रेग्नेंसीवर आधारित आहे. विनोदाची झालर असलेल्या या चित्रपटात अक्षय आणि करीनाने पती-पत्नीची भूमिका वठवली आहे. तर दिलजीत दोसांज आणि किआरा आडवाणी हेदेखील पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर मजेशीर असून बत्रा फॅमिलीची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. आयव्हीएफ ट्रीटेमेंट सुरु असताना आडनाव सारखे असल्याने स्पर्म एक्सजेंच होतात आणि त्यानंतर घडणारा गोंधळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 27 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.