'दहा वर्षे मोठा असला तरी तो माझ्यासाठी फक्त सैफ आहे', करिनाने स्वतः उलगडली आपली प्रेम कथा 

'सैफने मला त्यावेळी खूप आधार दिला होता' - करिना... 
 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 28,2019 01:38:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. यापूर्वी दोघांनी कधीच आपली लव्हस्टोरी जगासमोर अाणली नाही. मात्र पहिल्यांदाच करिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सैफविषयी आपले प्रेम व्यक्त केले.

करिनाची प्रेमकथा वाचा तिच्याच शब्दात...

- 'जेव्हा मी बोर्डिंग स्कूलमधून परत आले तेव्हा करिश्माने अभिनयात करिअर सुरू केले हाेते. तिला पडद्यावर पाहून मलादेखील अभिनय करण्याची इच्छा झाली. त्यानंतर मला चांगले चित्रपट मिळाले, पण एकदा एक वर्षापर्यंत काम केले नाही. तेव्हा वाटले माझे करिअर संपले.

- त्याच वेळी मला सैफने आधार दिला. मी त्यांना आधी भेटले हाेते, पण जेव्हा आम्ही 'टशन'च्या शूटिंगमध्ये भेटलाे तेव्हा माझ्यात बदल झाल्याचे जाणवले. नंतर लडाख आणि जैसलमेरमध्ये शूटिंगदरम्यान आम्ही बराच वेळ सोबत घालवला आणि लाँग बाइक राइड्सवर गेलाे. ते माझ्यापेक्षा दहा वर्षे मोठे आहेत आणि त्यांना दोन मुलेसुद्धा आहेत. पणे माझ्यासाठी ते फक्त सैफ आहेत, ज्याने मला स्वत: शी प्रेम करणे शिकवले.

X
COMMENT