आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan 48 Birthday Party: Kareena Kapoor To Sara Attend Saif Party But First Wife Amrita Singh Not Join

सैफ अली खानच्या 48 व्या वाढदिवशी झाली दारु पार्टी, पतीला वारंवार किस करताना दिसली करीना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सैफ अली खान 16 ऑगस्टला 48 वर्षांचा झाला आहे. 48 व्या वाढदिवशी करीनाने पती सैफसाठी बर्थडे पार्टी होस्ट केली होती. पार्टीमध्ये करीश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू, सारा खान, इब्राहिम अली खान पोहोचले. पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये सैफ घरी झालेली दारु पार्टी एन्जॉय करताना दिसतोय. पार्टीच्या व्हिडिओजमध्ये करीना वारंवार पती सैफला किस करताना दिसली. पार्टीमध्ये सैफचा मुलगा तैमूर दिसला नाही. तर त्याची पहिली पत्नी अमृता सिंहही सहभागी झाली नाही. 

 

लग्नाच्या 13 वर्षांनंतर वेगळे झाले होते सैफ-अमृता 
सैफ आणि अमृताचे लग्न 1991 मध्ये झाले होते. साराच्या जन्माच्या जवळपास 8 वर्षानंतर सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला. याच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला.
- सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले. आता त्यांना तैमूर हा मुलगा आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता. 
- सैफची मुलगी सारा ने 2016 मध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे आणि सध्या ती बॉलिवूड डेब्यूमध्ये व्यस्त आहे. 'केदारनाथ' हा तिचा डेब्यू चित्रपट 30 नोव्हेंबरला रिलीज होऊ शकतो. 


डेब्यूपुर्वीच ग्लॅमरसशी जोडली आहे सारा 
- सारा ही चित्रपटांमध्ये एंट्री घेण्यापुर्वीच ग्लॅमरस वर्ल्डशी जोडली आहे. जानेवारी 2012 मध्ये तिने फॅशन मॅगझीन 'हॅलो'साठी फोटोशूट केले होते. यामध्ये ती आई अमृतासोबत दिसली होती. 
- साराने ऑगस्ट 2012 मध्ये रॅम्पवर डेब्यू केला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीने ही पार्टी होस्ट केली होती. फॅशन डिझायनर अबू जानी-संदीप खोसलाने फॅशन वर्ल्डमध्ये 25 वर्षे पुर्ण करण्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. सारा अबू आणि संदीपचे डिझायनर आउटफिट घालून रॅम्पवर उतरली होती. 
- सैफचा मुलगा इब्राहिम हा 17 वर्षांचा आहे आणि सध्या आपल्या शिक्षणावर फोकस करतोय. इब्राहिमने यशराज प्रोडक्शनच्या 'टशन' चित्रपटात सैफच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...