आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kapoor Family Ancestral House In Pakistan: Kareena Ranbir To Prithviraj Kapoor Rishi Kapoor And Taimur Is In Kapoor Khandaan Five Generations

कपूर घराण्याच्या हवेलीला पाकिस्तान सरकार बनवणार संग्रहालय, विभाजनानंतर पृथ्वीराज कपूरला सोडावे लागले होते पेशावर, या घराण्याने बॉलिवूडला दिले 23 कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऋषी कपूर यांच्या विनंतीनंतर पाकिस्तान सरकारने कपूर घराण्याच्या हवेलीचे आता संग्रहालयात रूपांतर करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी सांगितले की, " ऋषी कपूर यांनी मला फोन करून विनंती केली होती की त्यांच्या पारंपरिक हवेलीला संग्रहालय किंवा एखाद्या संस्थानात रूपांतरित करावे. आम्ही त्यांची ही विनंती मान्य केली आहे." किस्सा ख्वानी बाजार या ठिकाणी असलेली ही हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. पृथ्वीराज हे कपूर घराण्यातले पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1947 च्या विभाजनानंतर कपूर घराण्याला पेशावर सोडावे लागले आणि अभिनय करण्यासाठी मुंबईत ते स्थायिक झाले. पृथ्वीराज यांच्या पश्च्यात त्यांची मुले, नातवंडे आणि अशा पुढच्या पाच पिढयांही अभिनय क्षेत्रातच काम करत आहेत. कपूर घराण्याने बॉलिवूडला आतापर्यंत 23 कलाकार दिले आहेत. त्यातले बहुतांश स्टार झाले आणि आता तैमूर या घरातल्या पाचव्या पिढीचा सदस्य आहे. 

 

तहसीलदार होते वडील, पण पृथ्वीराज झाले अभिनेते.. 
- दिवाण बशेश्वरनाथ कपूर हे नाव कपूर घराच्या फॅमिली ट्रीमध्ये अग्रस्थानी येते.  पृथ्वीराज यांचे वडील आणि ऋषी कपूर यांचे पणजोबा बशेश्वरनाथ, व्यवसायाने तहसीलदार होते. जवळपासच्या लोकांमध्ये ते 'दिवाण साहेब' म्हणून ओळखले जायचे. 
- बशेश्वरनाथ यांची दोन मुले होती पृथ्वीराज आणि त्रिलोक कपूर. त्रिलोक कपूर यांनीही बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम केले. 23 सप्टेंबर 1988 साली त्यांचे निधन झाले. त्रिलोक कपूर यांचीही दोन मुले होती. त्यातील विक्की कपूर हे अभिनेते तर विजय कपूर यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले. 
- पृथ्वीराज यांनी 22 व्या वर्षी 19 वर्षांच्या रामसारणी मेहरा यांच्याशी विवाह केला. राज कपूर यांचा जन्म झाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1927 मध्ये पृथ्वीराज मुंबईमध्ये आले.  1930 मध्ये रामसारणी कपूर यासुद्धा मुंबईमध्ये आल्या. 
- पृथ्वीराज आणि रामसारणी यांची तीन मुले होती. राज कपूर, शमशेर राज (शम्मी कपूर), बलवीर राज (शशी कपूर). हे तिघेही आता ह्यात नाहीत. त्यांना एक मुलगीदेखील होती, उर्मिला सियाल. उर्मिला आता कशी आहे? कुठे आहे? जिवंतही आहे की नाही? हे कुणालाच माहित नाही. ती कपूर घराण्याच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाही.
- रामसारणी यांनी अजून दोन मुलांना जन्म दिला होता. देविंदर आणि रविंदर कपूर ही त्यांची नावे होती. मात्र त्या दोघांचा  एका आठवड्याच्या आतच निमोनियामुळे मृत्यू झाला. जर हे दोघेही जिवंत असते तर पृथ्वीराज यांची एकूण पाच मुले असती. 
- पहिल्या पिढीतील पृथ्वीराज कपूर यांचे निधन 29 मे 1972 रोजी झाले आणि त्याचवर्षी जूनमध्ये त्यांची पत्नी रामसारणी यांचेही निधन झाले. 

 

राज कपूर ते तैमूर, अशा आहेत कपूर घराण्याच्या पिढ्या.. 
- 1 ऑक्टोबर 2018 रोजी कृष्णा राज कपूर यांच्या मृत्युसोबतच कपूर घराण्याच्या दोन पिढया आता कालवश झाल्या आहेत. कृष्णा कपूर यांचे पती राज कपूर यांचे निधन 2 जून 1988 रोजी झाले तर शशी कपूर यांचे निधन 4 सप्टेंबर 2017 रोजी झाले. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कँडल यांनी 7 सप्टेंबर 1984  तर शम्मी कपूर यांनी 14 ऑगस्ट 2011 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

- शम्मी कपूर यांच्या पत्नीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची पहिली पत्नी गीता बाली यांचे निधन 21 जानेवारी 1965 रोजी झाले. त्यांच्या दुसऱ्या पत्नी नीला देवी या जिवंत आहेत. त्यामुळे दुसऱ्या पिढीतील आता फक्त नीला देवी ह्यात आहेत.  
- या घराण्यातील तिसरी पिढी म्हणजे राज कपूर-कृष्णा कपूर यांची मुले, रणधीर, ऋषी, राजीव, रितू नंदा आणि रीमा जैन ही आहेत. शम्मी कपूर-गीता कपूर यांची मुले, आदित्य राज कपूर आणि कांचन ही आहेत. तसेच शशी-जेनिफर कपूर यांच्या मुलांची नावे करण, कुणाल आणि संजना कपूर ही आहेत. 
- चौथ्या पिढीतील रणधीर-बबिता कपूर यांच्या दोन मुली असून करिश्मा आणि करीन कपूर ही त्यांची नावे आहेत. ऋषी-नीतू कपूर यांनाही एक मुलगा आणि एक मुलगी असून रणबीर आणि रिद्धिमा कपूर ही त्यांची नावे आहेत. राज कपूर यांची कन्या रितू राजन नंदा यांना एक मुलगा असून त्याचे नाव निखिल नंदा आहे. तर दुसरी मुलगी रीमा मनोज जैन हिला अरमान आणि आदर जैन ही दोन मुले आहेत. 
- पाचव्या पिढीतील करीनाला एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर अली खान आहे. करीनाचे लग्न सैफ अली खानसोबत झाले आहे. तर रणधीर-बबिता यांची थोरली कन्या करिश्माला समायरा ही एक मुलगी आणि कियान हा एक मुलगा आहे. करिश्माचे लग्न संजय कपूरसोबत झाले होते, पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.ऋषी कपूर यांची कन्या रिद्धिमा हिला एक मुलगी असून समायरा हे तिचे नाव आहे. रिद्धिमाचे लग्न दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमनसोबत झाले आहे.  रितू जैन यांचा मुलगा निखिल आणि त्याची पत्नी श्वेता बच्चन नंदा यांना नव्या नवेली ही एक मुलगी आणि अगस्त्य हा एक मुलगा आहे.

- कृष्णा मल्होत्रा आणि राज कपूर यांचा विवाह 1946 मध्ये झाला होता. कृष्णा लग्न झाल्यानंतरही चित्रपटांपासून दूरच होत्या. मात्र त्यांच्या तीनही मुलांनी चित्रपटात काम केले. पण तिघांपैकी ऋषी कपूर यांनाच सिनेसृष्टीत भक्कम यश मिळाले. कृष्णा-राज कपूर यांच्या मुलींनाही चित्रपटात फारसा रस नव्हता. 

 

कपूर घराण्यातील कलाकार.. 
1   - पृथ्वीराज कपूर 
2   - त्रिलोक कपूर 
3   - राज कपूर 
4   - शशी कपूर 
5   - शम्मी कपूर 
6   - जेनिफर कँडल 
7   - गीता बाली 
8   - विक्की कपूर 
9   - विजय कपूर 
10 - आदित्य राज कपूर 
11 - करण कपूर 
12 - कुणाल कपूर 
13 - संजना कपूर 
14 - रणधीर कपूर  
15 - ऋषी कपूर 
16 - राजीव कपूर  
17 - नीतू कपूर 
18 - बबिता कपूर  
19 - करिश्मा कपूर 
20 - करीना कपूर 
21 - रणबीर कपूर 
22 -अरमान जैन 
23 -आदर जैन         

  

 

बातम्या आणखी आहेत...