आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारने कारगिल विजय दिवसावर भारतीय सेनेच्या जवानांना सॅल्यूट करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हडिओमध्ये सैनिक, अक्षयचा चित्रपट 'केसरी' चे गाणे 'तेरी मिट्टी' हे गातांना दिसत आहेत. अक्षयने लिहिले आहे, 'या व्हिडीओने माझा आजचा दिवस बनवला, जेव्हा तुमचे एक छोटेसे योगदान लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा तेव्हाच ते प्रत्यक्षात पूर्ण होते. याव्यतिरिक्त आणखी काय पाहिजे. आपल्या भारताच्या वीरांना लाखो सलाम.'
भारताच्या वीरांसाठी सक्रिय असतो अक्षय...
अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये भारताच्या वीरांचा उल्लेख आहे. भारताचे वीर गृह मंत्रालयाद्वारा बनवलेली एक ट्रस्ट आहे, ज्याच्या 7 ट्रस्टीपैकी अक्षय कुमारदेखील एक आहे. या ट्रस्टचा उद्देश्य सीएपीएफ जवानांच्या नातेवाईकांना मदत पोहोचवणे. ज्यामध्ये देशातील सामान्य नागरिकदेखील सहज हेल्प करू शकतात. अक्षयने ही पोस्ट त्या दिवशी केली आहे ज्या दिवशी 1999 मध्ये भारतीय सेनेने कारगिलवर विजय मिळवला.
नवा भारत कुमार आहे अक्षय...
'खिलाडी'पासून भारत कुमारपर्यंतचा प्रवास करण्यापर्यंत अक्षय कुमारने अनेक चित्रपट केले. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'हॉलीडे', 'बेबी' यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्याला भारत कुमारची पदवी मिळाली आहे. अक्षयचा यापूर्वीचा चित्रपट 'केसरी' होता, ज्यामध्ये सारागडीच्या युद्धाचे हवलदार ईशर सिंहचा रोल त्याने साकारला होता. आगामी चित्रपट 'मिशन मंगल' आहे, जो भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनच्या यशाची कहाणी दाखवली फेली आहे. 'मिशन मंगल' 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.