आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Kargil Vijay Diwas Commemorative Function Delhi Indira Gandhi Indoor Stadium

कारगिल विजय दिवस/ मोदी म्हणाले- पाकिस्तानने काश्मीरसाठी अनेकवेळेस दगा-फटका केला, पण 1999 मध्ये आम्ही त्यांना चोख उत्तर दिले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शनिवार) कारगिल विजय दिवसाच्या समारंभात सामील झाले होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले पाकिस्तानने काश्मीरसाठी अनेकवेळेस दगा-फटका केला, पण 1999 मध्ये आम्ही त्यांना चोख उत्तर दिले. तसेच त्यांनी कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ते म्हणाले मी रक्क सांडणाऱ्या जवानांच्या आईनांही प्रणाम करतो. 20 वर्षांपूर्वी वीरगाथा लिहीली होती, त्याने तरुण पिढीला प्रेरणा मिळत राहील.


मोदींनी यादरम्यान इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कारगिलच्या शहीदांबाबत लागलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, "जवानांसाठी त्यांचे कर्तव्यस सर्वकाही असते. त्यांचे जीवन सरकारच्या कार्यकाळावर अवलंबून नसते. सरकार कोणाचेही असो, जवानांच्या पराक्रमावर देशाचा हक्क असतो. मी युद्धादरम्यान 20 वर्षांपूर्वी कारगीलला गेलो होतो. तेव्हा शत्रु वर बसून खेळ खेळत होता. मृत्यू समोर होता, पण प्रत्येक जवानाला त्या टोकावर जायचे होते. 2014 मध्ये मी त्या जागेवर जाऊन प्रणाम करुन आलो आहे."


‘शहीदांच्या मुलांसाठी स्कॉलरशिपचे काम पूर्ण’ 
मोदी म्हणाले, "युद्धादरम्यान भारतातील तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे आले होते, त्यांच्यासाठी लहान मुलांनी आपला गल्ला फोडून आर्थिक मदत करण्याचे धाडस दाखवले होते. अटलजी त्या वेळेस म्हणाले होते, देशासाठी मरणाऱ्या जवानांसाठी आपण काहीच केले नाही तर मातृभूमीचे कर्ज आपण फेडू शकणार नाहीत. आमची सरकार जवानांना सशक्त बनवण्याचे काम करत आहे. आम्ही त्यांच्यासाठी वन रँक वन पेंशन आणि आता दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या मुलांची स्कॉलरशीप वाढवण्याचे काम केले आहे. त्यांच्या आठवणीत नॅशनल वॉर मेमोरीअलची स्थापना केली आहे."

 

आम्ही नेहमीच अहिंसेचा मार्ग निवडला
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, अटलजी यांनी सांगतिले होते की, जगातील इतर देश कारगिलबाबत हस्तक्षेप करतील आणि आणखी एक नवीन सिमा तयार करण्यात यशस्वी होतील असे पाकिस्तानला वाटले होते. पण आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ याची शत्रुंना नव्हती. अटलजींनी पाकिस्तानसोबत शांतीचा प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जगाचा दृष्टीकोन बदलत होता. आपण कधीच हिंसेची सोबत दिली नाही हा भारताचा इतिहास आहे. आपला देश रक्षक आणि मानवतासोबत चालत आला आहे. 

 

दहशतवादासोबतच सिमा सुरक्षा करणे आपल्यापुढे आव्हान आहे. यामुळे लष्कराला आधुनिक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी कोणच्याही दबावाखाली, प्रभावाखाली किंवी अभावाखाली काम होणार नाही. आम्ही दबावातही लष्काराला मजबूत बनवण्यासाठी पाऊले उचलली आहेत आणि पुढेही उचलणार आहोत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी शक्य होईल तितका प्रयत्न करत आहोत. जवानांसाठी रायफल्स आणि इतर हत्यार तयार करण्यात येत आहे. यासाठी विदेशांतून हत्यार खरेदी करण्यात येत आहेत. 


झेंड्याचे तीन रंग आपल्याला प्रेरणा देतात
पुढे बोलतांना ते म्हणाले की, वर्दी कोणतीही असू द्या, त्याचा रंग कोणताही असू द्या पण सर्वांचे उद्देश आणि मन एकच आहे. आपल्या तिरंग्यातील तिन्ही रंग आपल्याला जगण्या-मरणाची प्रेरणा देतात. झेंड्याप्रमाणेच आपले तिन्ही लष्कराला एकत्र येऊन काम करावे लागेल. देशातील 17 राज्यांमध्ये 450 कोटी रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. देशाची सुरक्षा अभेद्य आहे आणि पुढेही राहील असा मला विश्वास आहे. 


26 जुलै रोजी कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाले. शुक्रवारी नरेंद्र मोदींनी 1999 सालचे कारगिलमधील जवानांसोबतचे आपले काही फोटो शेअर करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. 

बातम्या आणखी आहेत...