आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kargil War Completes 20 Years: Air Chief Creates Missing Man Formation, Awakens Memories Of Martyrs

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण : हवाई दल प्रमुखांनी मिसिंग मॅन फॉर्मेशन बनवून शहिदांच्या स्मृती जागवल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिसियाना हवाई दलाच्या केंद्रावरून उड्डाण घेण्याआधी वायु दलाचे अधिकारी. - Divya Marathi
भिसियाना हवाई दलाच्या केंद्रावरून उड्डाण घेण्याआधी वायु दलाचे अधिकारी.

बठिंडा - एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआंनी पंजाबमध्ये बठिंडाजवळ भिसियाना वायुदल स्टेशनहून मिग २१ विमानाने उड्डाण घेतले. त्यांनी ‘मिसिंग मॅन’ फॉर्मेशन बनवून कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. कारगिलला २० वर्षए पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवानांच्या स्मृतीत हा कार्यक्रम झाला. धनोआ तेव्हा १७ व्या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर होते.  उड्डाणात एअर मार्शल आर. नांबियार यांनीही भाग घेत श्रद्धांजली वाहिली.
 २५ मे रोजी हवाई दलाला आक्रमणाचे आदेश मिळाले होते. दुसऱ्याच दिवशी हवाई दलाने ऑपरेशन ‘सफेद सागर’मध्ये शत्रूवर हल्ला केला. पहिला हल्ला २६ मे १९९९ ला सकाळी ६.३० वाजता झाला. त्या हल्ल्यात मिग-२१, मिग-२७ एमएल आणि मिग-२३ बीएन लढाऊ विमानांचा वापर झाला. दुसऱ्याच दिवशी भारताचे मिग २१ बेपत्ता झाले होते. त्याचा शोध स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा मिग 27 विमानाने करत होते. विमान शत्रूच्या टप्प्यात आले तेव्हा ते पॅराशूटने उतरले. पाकिस्तानी लष्कराने त्यांची हत्या केली होती.

 

राफेल येताच पाकच्या तुलनेत आपले पारडे जड होईल : एअर चीफ मार्शल

> धनोआ म्हणाले की, २००२ मध्ये ऑपरेशन पराक्रमदरम्यान पाकिस्ताकडे क्षमता नव्हती. मात्र नंतर त्याने आपली क्षमता वाढवली. पण राफेल येताच आपले पारडे पुन्हा जड होईल. 


> भारताला आपल्या सुरक्षेसाठी वायुदलाच्या २४ स्क्वाड्रन पाहिजेत. सध्या आपल्या फक्त ३१ स्क्वाड्रनच काम करत आहेत.