आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kargil's Victory Marks 20 Years, Bollywood Stars Playing Football With Indian Army And Navy Force

कारगिलच्या विजयाला झाली 20 वर्षे पूर्ण, यानिमित्ताने बॉलिवूड स्टार्स जवानांसोबत खेळले फुटबॉल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 26 जुलैला संपूर्ण देशात कारगिल विजय दिन साजरा केला जात आहे. यावर्षी कारगिल युद्ध होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याप्रसंगी स्टार्स आर्मी आणि नेव्हीच्या जवानांसोबत फुटबॉल मॅच कारगिल कप एग्जीबिशन मॅच खेळले. अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, ईशान खट्टर, शशांक खेतान, अहान शेट्टी, डिनो मोरिया आणि करण वाही यांसारख्या स्टार्सने ही, मॅच खेळली. 

 

सेलिब्रिटींच्या टीमने जिंकली मॅच... 
ही मॅच मुंबई डिफेंस फोर्सच्या कूपरेज ग्राउंडमध्ये खेळली गेली. सेलिब्रिटींची टीम ऑल स्टार्स एफसी ब्लू जर्सीमध्ये दिसले तर आर्मी आणि नेव्हीची टीम रेड ड्रेसमध्ये होती. पावसात सर्वांनी ही मॅच खेळली. स्टार्सदेखील आर्मी नेव्हीच्या जवानांसारखे हिमतीने खेळत राहिले आणि पावसामुळे मॅच थांबवली नाही. या मॅचची विजेता टीम सेलिब्रिटीजची टीम ठरली.   

 

 

पुन्हा एकदा प्रदर्शित झाला विकीचा चित्रपट 'उरी'... 
यानिमित्तानेच विकी कौशल स्टारर चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' महाराष्ट्रात पुन्हा एकदा रिलीज केला गेला. विकीने आपल्या ट्विटरवर सांगितले, 'मला खूप अभिमान वाटतो आहे की, आमचा चित्रपट कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रदर्शित केला गेला. 500 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये हा चित्रपट पुन्हा दाखवला गेला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना खूप खूप धन्यवाद म्हणतो.' तो पुढे म्हणाला, 'मला खरोखरीच अपेक्षा आहे की उरी... प्रत्येक भारतीयाला देशाची सेवा करण्यासाठी प्रेरित करत राहील.'  

 

विकीचे ट्वीट...