आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांपासून चित्रपटांपासून गायब आहे करिश्मा कपूर, आता दिसणार नवीन वेब सीरीजमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: डिजिटल स्पेस सुरु झाल्यानंतर अनेक फिल्म मेकर्स आणि अॅक्टर्सला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अनेक आर्टिस्ट्नंतर आता करिश्मा कपूरही या प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दिलेल्या मुलाखतीत करिश्मा म्हणाली होती की, 'मी आई होऊन खुप आनंदी आहे. जोपर्यंत माझ्या मनाला स्पर्श करेल असा प्रोजेक्ट येत नाही. तोपर्यंत मी काहीच काम स्विकारणार नाही. सध्या मी अॅक्टिंग करण्याचा विचार करत नाहीये.' कदाचित आता करिश्माला चांगला प्रोजक्ट मिळाला आहे. 


सूत्रांनुसार 'करिश्माने एकता कपूरच्या अल्ट बाजालीसोबत एक डील साइन केली आहे. ती त्यांच्यासाठी एक वेब सीरीज करणार आहे. तिने स्क्रिप्ट आणि डेट्सही लॉक केल्या आहेत. परंतू याविषीय अजून कुणासोबत बोलली नाही. करीश्मा शेवटच्यावेळी 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'डेंजरस इश्क'मध्ये दिसली होती. हा तिचा कमबॅक चित्रपट होता. परंतू हा फ्लॉप ठरला होता. यापुर्वी तिने 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरे जीवन साथी'मध्ये काम केले होते.'

 

बातम्या आणखी आहेत...