आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karishma Kapoor And Salman Khan Shares True Friendship Bond

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नात सलमानसोबत दिसली करिश्माची खास बॉन्डिंग, नवरा जवळ उभा होता आणि करिश्मा मात्र सुपरस्टारसोबत देत होती पोज, व्हिडीओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करिश्मा कपूरच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये तिचा पती (आता एक्स) संजय कपूरसोबतच जॅकी श्रॉफ, सलमान खान आणि गोविंदाही दिसले. आपला खास मित्र सलमानला लग्नात पाहून करिश्मा खूप खुश दिसत होती. तिने सलमानला अलिंगनही दिले. या व्हिडिओमध्ये हेही दिसते की सलमानसोबतची करिश्माची बॉन्डिंग बघून संजय थोडा अनकम्फर्टेबल होता. तो कधी डोक्यावरची पगडी सरळ करतो तर कधी उगीच इकडे तिकडे बघतो. करिश्मा आणि संजयचे लग्न 29 सप्टेंबर 2003 ला मुंबईमध्ये झाले होते आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांची मुले (मुलगी समायरा आणि मुलगा कियान राज) आता करिश्मासोबतच राहतात.  

 

सलमान खानची खास मैत्रीण आहे करिश्मा कपूर...
- 44 वर्षांची करिश्मा कपूर 53 वर्षांच्या सलमान खानच्या मित्रमंडळींमध्ये सामील आहे. दोघांनी 'अंदाज अपना अपना', 'जुड़वा' 'बीवी नंबर 1' आणि 'दुल्हन हम ले जाएंगे' अशा चित्रपटात सोबत काम केले. सलमानने करिश्माची करीनासोबतही 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात काम केले आहे. पण तो करिश्माच्या जास्त जवळ आहे. स्वतः करिश्माने एका इंटरव्यूमध्ये, "सलमान करीनापेक्षा माझ्या जास्त जवळ आहे. आम्ही खूप लॉन्ग स्टैंडिंग रिलेशनशिप शेयर करतो. सलमानसाठी करीना अजूनही छोट्या बहिणीसारखी आहे आणि तो तिला अजूनही लहान मुलगी समजतो"

 

अशी आहे सलमान आणि करिश्माची मैत्री... 
करिश्मा सलमानची इतकी क्लोज फ्रेंड आहे की 90 च्या दशकामध्ये जेव्हा सलमानला कन्विंस करण्याची वेळ यायची तेव्हा फिल्ममेकर्स करिश्माला फोन करायचे. एवहडेच नाही तर जेव्हा फिल्मफेयर मैगजीनच्या शुची साठी सलमानने डेट उपलब्ध नसल्याचे कारण सांगून नकार दिला होता तेव्हा करिश्माने त्याला कॉल केला आणि मग तो शूटसाठी तयार झाला होता.