आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानसोबत ‘राजा हिंदुस्तानी’ च्या चुंबन दृश्यावर 24 वर्षांनंतर बोलली करिश्मा कपूर, म्हणाली...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘हे दृश्य चित्रीत करण्यासाठी 3 दिवस लागले, विचार करत होते हे कधी संपणार’
  • ‘मेंटलहूड’च्या प्रमोशनच्यावेळी सांगितले मजेदार किस्से

एंटरटेन्मेंट डेस्कः नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री सध्या चित्रपटांपासून लांब आहे. ती लवकरच वेब शो ‘मेंटलहूड’च्या माध्यमातून पदार्पण करणार आहे. ती सध्या याच्याच प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान एका मुलाखतीत 1996 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘राजा हिंदुस्थानी’च्या आठवणींना उजाळा दिला. तिने या चित्रपटातील आमिर खान सोबतच्या चुंबन दृश्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या चुंबन दृश्यापैकी एक असलेल्या या दृश्याबाबत करिश्मा म्हणाली, ‘राजा हिंदुस्थानी चित्रपटाबाबत खूप साऱ्या आठवणी आहेत. ज्यावेळी हा चित्रपट आला तेव्हा त्यावेळी ‘चुंबन’बाबत खूप चर्चा होती, परंतु लोकांना हे माहीत नाही की, हे दृश्य करायला तीन दिवस लागले. यादरम्यान मी फक्त हाच विचार करत होते की, हे कधी संपेल, कारण फेब्रुवारी महिन्या उटीमध्ये खूप थंडी होती आणि सायंकाळी 6 वाजता हे दृश्य चित्रित केले होते. या दरम्यान मी थंडीने मी कुडकुडून जायचे.’

‘मला कधी स्लीव्हलेस घालायला आवडले नाही’

करिश्मा कपूरच्या मते ती खूप साधे जीवन जगते. पडद्यावरील तिचे व्यक्तिमत्त्व पाहून लोक अवाक होतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘अभिनेत्री असूनही मला साधे राहायला आवडते. लोक मला भेटतात तर विचारतात की, तुम्ही या गाण्यांमध्ये आिण डेव्हिड धवनच्या चित्रपटात काम कसे केले.?’ मला कधीच स्लीव्हलेस घालायला आवडत नाही. कारण मला हे खूप विचित्र वाटते. तशी मी खूप परंपरावादी आहे.

‘माझे संपूर्ण आयुष्य ऑनलाइन शेयर करू शकत नाही’

मोजक्याच लोकांमध्ये मिसळणारी करिश्मा इन्स्ट्राग्रामसारख्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉमवर दिसून येते आणि तिला ५ दशलक्षपेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत, परंतु ती याबाबत अगदी ठाम आहे की, तिला तिचे संपूर्ण आयुष्य जगासमोर दाखवायचे नाही. ती म्हणते,‘मी काळासोबत पुढे जाणाऱ्या लोकांपैकी एक आहे. माणूस म्हणून माझ्यासाठी हे खूप गरजेचे आहे. हे डिजिटल युग आहे. परंतु, मी याबाबत खूप सजग आहे की काय पोस्ट करायचे आणि काय नाही. काही गोष्टींबाबत मी प्रायव्हसी ठेवते.’ करिश्मा लवकरच अल्ट बालाजीच्या वेबसिरीज ‘मेंटलहूड’मधून डिजिटलमध्ये डेब्यू करणार आहे. ज्याचे करिश्मा कोहलीने दिग्दर्शन केले आहे. याची स्ट्रीमिंग 11 मार्चला होणार आहे.