आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karisma Tanna Celebrates Her 36th Birthday In Maldives, Give Glamours Poses At The Pool And On The Beach.

करिश्मा तन्नाने मालदीवमध्ये साजरा केला 36 वा वाढदिवस, कधी पूल तर कधी बीचच्या किनाऱ्यावर दिल्या ग्लॅमरस पोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : टेलीव्हिजन स्टार करिश्मा तन्ना सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. करिश्माचा वाढदिवस 21 डिसेंबरला होता ती आता 36 वर्षांची झाली आहे आणि हाच बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी करिश्मा मालदीवला गेलेली आहे. तेव्हापासूनच ती एकापेक्षा एक हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. करिश्माच्या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः हॉलिडेमधील तिच्या लूक आणि फॅशनेबल आउटफिट्सचे खूप कौतुक होत आहे. करिश्मा हॉलिडेला कधी बिकिनी तर कधी स्विमसूट घालून पूलमध्ये किंवा समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. 

'संजू' मध्ये दिसली होती करिश्मा... 


करिश्मा मागच्यावर्षी 'संजू' चित्रपटातदेखील दिसली होती. करिश्मा 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहीं तो मिलेंगे', 'कोई दिल में है', 'प्यार के दो नाम', 'एक राधा एक श्याम', 'विरासत' आणि 'बालवीर' यांसारख्या अनेक सीरियल्समध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त ती 'कॉमेडी सर्कस', 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलाड़ी 7' मध्येही दिसली आहे. संजूव्यतिरिक्त करिश्मा 'दोस्ती : फ्रेंडशिप फॉरएवर' आणि 'ग्रँड मस्ती' या चित्रपटांमध्येही दिसली आहे. सध्या करिश्मा फॅशन ब्रँड 'लव्ह'चे ब्रॅण्डिंग करत आहे. करिश्मा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2.9 मिलियन फॉलोवर्स आहेत जिथे करिश्मा अनेकदा आपले ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते. 

बातम्या आणखी आहेत...