आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्योतिषमध्ये राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो असेल त्यांची राशी कर्क राहते. येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...
नामाक्षर : ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
राशीचे स्वरूप - खेकडा
राशी स्वामी - चंद्र
1. राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क. राशिचिन्ह खेकडा आहे. ही चर राशी आहे.
2. राशी स्वामी चंद्र आहे. त्यात पुनर्वसू नक्षत्राचे अंतिम चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण तसेच आश्लेषा नक्षत्राचे चार चरण येतात.
3. कर्क राशीचे लोक कल्पनाशक्तीचे धनी असतात.
4. शनी.सूर्य व्यक्तीची मानसिक स्थिती अस्थिर ठेवतात आणि अहंकार वाढवतात.
5. ज्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली जाते तेथे त्यांना त्रासाला तोंड द्यावे लागते.
6. शनी-बुध योगातून राशीची व्यक्ती बुद्धिमान होते. शनी-शुक्र व्यक्तीला पैसा आणि संपत्ती देतात.
7. शुक्र त्याला लावण्याची कला देते आणि शनी अधिक आकर्षण देते.
8. राशीच्या व्यक्ती उपदेश देणाऱ्या होऊ शकतात. बुध गणिताची जाण आणि शनिदेव लेखनाचा प्रभाव देतात.
9. खेकड्याने एखादी वस्ती पंजामध्ये पकडली तर लवकर सोडत नाही. त्याचप्रमाणे हे लोकसुद्धा आपले लोक आणि विचार सहजपणे सोडत नाहीत.
10. ही भावना त्यांना ग्रहणशील, एकाग्र आणि धैर्य गुण प्रदान करते.
11. यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही. कल्पनाशाकी आणि स्मरणशक्ती मजबूत असते.
12. आयुष्यभर मैत्री जपणारे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारे असतात.
13. हे स्वप्नात रमणारे तसेच कष्टाळू आणि उद्यमी असतात.
14. हे लोक बालपणात दुबळे असतात परंतु वयामानाने यांच्या शरीरात बदल होतो.
15. या लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.