Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कर्क आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 5 Sep 2018

कर्क राशी : 5 Sep 2018: जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Today Cancer Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • कर्क आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya | Today Cancer Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे कर्क राशिफळ (5 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.


  निगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.


  काय करावे - गोमातेला वंदन करा.


  लव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.


  करिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.

Trending