बुध ग्रहाचे राशी / बुध ग्रहाचा मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश, सर्व 12 राशींवर असा राहील प्रभाव

मेष राशीच्या लोकांना मिळेल सुख-शांती, कुंभ राशीच्या लोकांनी आहाराकडे द्यावे लक्ष

दिव्य मराठी

Jun 22,2019 10:13:49 AM IST

गुरुवार 20 जूनच्या रात्री जवळपास 12 वाजून 10 मिनिटांनी बुध ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. बुध चंद्राला शत्रू मानतो, परंतु चंद्र ग्रह बुध ग्रहाशी शत्रुत्व ठेवत नाही. बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. बुध ग्रह बुद्धी कारक ग्रह आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा पडेल प्रभाव.


मेष - या राशीपासून बुध चौथ्या स्थानात असल्यामुळे घर-कुटुंबात शांतता राहील. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मेहनतीचे फळ मिळेल.


वृषभ - वृषभ राशीपासून बुध तृतीय स्थानात राहील. यामुळे कुटुंबाच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते. जीवनाचा स्तर सुधारेल.


मिथुन - या राशीपासून चंद्र द्वितीय स्थानात राहील. यामुळे बुद्धीशी संबंधित कामांमधून विशेष लाभ होईल. आर्थिक व्यवहारात यश प्राप्त होईल.


कर्क - या राशीमध्ये बुध आल्यामुळे प्रवासाचे योग जुळून येतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आजारी पडण्याची शक्यता आहे. घर-कुटुंबात सुख-शांती राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीवर कसा राहील बुध ग्रहाचा प्रभाव...

सिंह - या राशीसाठी बुध बारावा राहील. यामुळे खर्च वाढू शकतात. व्यवसायासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. व्यर्थ वादामध्ये पडू नये. कन्या - कन्या राशीसाठी बुध अकरावा राहील. जुनी अडकेलेली कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात मान-सन्मान मिळेल आणि आरोग्यही चांगले राहील.तूळ - या लोकांसाठी बुध दहाव्या स्थानात राहील. लाभाचे योग जुळून येतील. फायदा करून देणारी एखादी मोठी संधी चालून येईल. काळ तुमच्या बाजूने राहील. वृश्चिक - बुध तुमच्यासाठी नववा राहील. यामुळे एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, यामुळे सतर्क राहावे.धनु - या राशीसाठी बुध आठवा राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. जोडीदारासोबत मतभेत होऊ शकतात. धैर्य बाळगावे. मकर - या राशीसाठी बुध शुभ राहील. वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम राहील. प्रवासाला जाण्याचे योग जुळून येतील. धनलाभ होऊ शकतो.कुंभ - तुमच्यासाठी बुध सहावा राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, आरोग्य बिघडू शकते. क्रोध करू नये. कर्जातून मुक्ती मिळू शकते. मीन - या लोकांसाठी बुध पाचवा राहील. शिक्षणाशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांना मनासारखे यश प्राप्त होईल.
X