Home | Business | Auto | Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore

ही आहे जगातील सर्वात महाग कार; टीव्ही, फ्रिज, कॉफी मशीन, सॅटेलाइट फोनसारख्या मिळतील सुविधा,

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:35 PM IST

कार तयार करण्यास लागतात 3.5 वर्षे, याची किंमत आणि नाव आहे........

 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore

  ऑटो डेस्क - सध्या जगभरात ऑटोमोबाईल कंपन्यांची भरमाड आहे. त्यात लँबोर्गिनी, लॅक्सेस, बीएमडब्लू, मर्सिडीज, पोर्शे, रेंज रोव्हरसह अनेक कंपन्या समाविष्ट आहेत ज्या महागड्या आणि लक्झरी कार बनवतात. हे सर्व असले तरी जगातील सर्वात महागडी कार यांपैकी एकाही कंपनीची नाही. जगातील सर्वात महाग कारचे नाव कार्लमन किंग आहे. आईएटी नामक कंपनीने या आलिशान अशा महागड्या कारची निर्मिती केली आहे.

  फक्त 12 यूनिट विकणार

  > कार्लमन किंग SUV तयार करण्यासाठी 1800 लोकांनी एकत्रित काम केले आहे.
  > कंपनीने सांगितले की, ह्या कारचे जगभरात केवळ 12 युनिट्स विकल्या जाईल.
  > एका कार्लमन किंग एसयूव्हीला तयार करण्यासाठी सुमारे 30,000 तास (1250 दिवस किंवा 3.5 वर्षे) लागतात.
  > कंपनीने दुबईतील आंतरराष्ट्रीय मोटर शोमध्ये 2017 रोजी या कारचे प्रदर्शन केले होते.
  > माध्यमांच्या अहवालानुसार, या कारची किंमत सुमारे 20 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 15 कोटी रुपये आहे.

  इंटीरिअर बदलणारी लाइट

  > ही कार फोर्ड एफ -550 प्लॅटफॉर्मवर तयार केली असून तिची लांबी 6 मीटर आहे.
  > SUV -40 डिग्री ते 200 डिग्री फारेनहाइटपर्यंत तापमान सहन करू शकते.
  > यामध्ये इंटीरिअर बदलणारे लाईट आहेत. LED लाईट्समुळे याचे छत निळ्या आकाशाप्रमाणे बनते.
  > यात उपग्रह टीव्ही, फ्रिज, सॅटेलाइट फोन, कॉफी मशीन आणि टेबल देखील समाविष्ट आहे.
  > या कारचे बरेच फीचर स्मार्टफोनमधील अॅपच्या मदतीने नियंत्रित केले जाऊ शकतात.


  इंजिन आणि स्पीड
  > SUV मध्ये 6.8 लिटर V8 इंजिन आहे. इंजिनमध्ये 400bhp पावर जनरेट करण्याची क्षमता आहे.
  > कार्लमन किंगचा टॉप स्पीड 140kmph आहे.
  > कारचे एक्सटीरिअर स्टील आणि कार्बन फायबरने बनवलेले आहे.
  > एका फायटर प्लेनसारख्या दिसणाऱ्या गाडीचे वजन सुमारे 6,000 किलो आहे.
  > कार्लमन किंगमध्ये हाय-फाई साउंडसह अल्ट्रा 4 K टेलिव्हिजन सेट देखील दिला आहे.

  कार्लमॅन किंगच्या महागड्या कारचे पुढील स्लाइड्सकडे पाहा फोटोज...

 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore
 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore
 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore
 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore
 • Karlmann King Is The World's Most Expensive SUV; Price Rs. 15 Crore

Trending