Home | National | Other State | Karnal Ranveer Singh is the first officer who peak highest mountain in Jammu Kashmir  

रणवीरसिंह 7 बेटांतील सर्वात उंच शिखर फत्ते करणारे पहिले अधिकारी 

वृत्तसंस्था | Update - Jan 13, 2019, 10:12 AM IST

कर्नल रणवीरसिंह यांनी ४ जानेवारी रोजी अंटार्क्टिकाच्या माऊंट विन्सन मॅसिफची चढाई पूर्ण केली.

  • Karnal Ranveer Singh is the first officer who peak highest mountain in Jammu Kashmir  

    जम्मू- जम्मू-काश्मीरचे कर्नल रणवीरसिंह जम्वाल जगातील सात बेटांतील सर्वात उंच डोंगर फत्ते करणारे देशातील पहिले लष्करी अधिकारी ठरले आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांनी अंटार्क्टिकाच्या माऊंट विन्सन मॅसिफची चढाई पूर्ण केली. कर्नल रणवीरसिंह जम्वाल मूळचे सांबा जिल्ह्यातील भडोरी गावचे आहेत. २५ डिसेंबर रोजी ते या प्रवासास निघाले. गुरुवारी सकाळी त्यांनी शिखर बैठक संपवून अंटार्क्टिकातील पुंटा अरीनास येथे मुक्काम केला. कर्नल रणवीरसिंह जम्वाल जम्मू-काश्मीर व गढवाल हिमालयात अनेक बचाव कार्यात सहभागी राहिलेले आहेत.

    विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी आफ्रिकेतील बेटावरील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारो २०१० मध्ये सर केले. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी आशियातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. तीन एव्हरेस्ट मोहिमेत भाग घेणारे ते एकमेव भारतीय आहेत.

Trending