Maharashtra Special / मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा कर्नाटकात डंका, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळा पाहण्यासाठी राज्यातील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती पालकांच्या भेटीला

कर्नाटक राज्यातील लोक इंगोले वस्ती डिजिटल शाळा पाहण्यासाठी  गाडीकरून 150 किलोमीटर दूरवरुन आले

दिव्य मराठी

Aug 19,2019 10:14:16 PM IST

पापरी- जिल्ह्यातील इंगोलेवस्ती जिल्हा परिषद खंडाळी शाळेचा डंका कर्नाटक राज्यात वाजला आहे. येथील शाळा पाहण्यासाठी कर्नाटकहुन सरकारी प्राथमिक कन्नड शाळा गुडलेनवरवस्ती सातपूर, तालुका-इंडी जिल्हा- विजापूर येथील शिक्षक वृंद व तेथील शाळा व्यवस्थापन समिती आलेली होती. फेसबुक व व्हाट्सअप सारख्या सोशल माध्यमातून खंडाळी येथील इंगोलेवस्ती शाळेच्या यशस्वीतेच्या विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठीच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून, कर्नाटक राज्यातील लोक इंगोले वस्ती डिजिटल शाळा पाहण्यासाठी गाडीकरून 150 किलोमीटर दूरवरुन आले होते.


ही बाब आम्हा शाळेसाठी तसेच सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुका, शिक्षण विभागासाठी गौरवास्पद असल्याचे, मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी दै. दिव्य मराठीला सांगितले. आलेले शिक्षक,पालक, त्यांची भाषा जरी वेगळी असली तरी त्यांनी मराठी, हिंदी भाषेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती समजून घेतली. शाळेचा भौतिक परिसर, सुविधा, ई-लर्निंग डिजिटल क्लास, लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, इंग्रजी वाचन, आदि बाबत उपक्रमशिल शिक्षक रवी चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रिसिजन कंपनी, लोक वर्गणी, ग्राम पंचायत, पालक सहभाग, माजी विद्यार्थी आदिं कडून दिलेल्या आर्थिक व यांत्रिक साहित्याचा अध्यापनातील वापर पाहून ही टीम हरखून गेली होती. इंगोले वस्ती शाळेने शाळा परिसरात केलेली विविध फळ फुले लावलेली झाडे, झाडांवर पक्ष्यासाठी केलेली चारा पाण्याची सोय, विद्यार्थ्यांनी फेसबुक सारख्या सोशल माध्यमाच्या माध्यमातून अमेरिकेतील शास्त्रज्ञाशी साधलेला संवाद, शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी पालकांना मोबाइल वर दररोज पाठवित असलेला अभ्यासक्रम आदि उपक्रम पाहुन आलेले पालक शिक्षक यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


आजपर्यंत इंगोले वस्ती शाळेत सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक शिक्षक, शाळा,यांनी भेटी दिलेल्या आहेत. परंतु आज राज्याबाहेरील शिक्षकांच्या भेटीमुळे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना खूप आनंद झालेला दिसून येत होता.

आम्ही सरकारी प्राथमिक शाळा गुडलेनवर वस्ती शाळा सातपूर ता-इंडी जि-विजयपूर, कर्नाटक राज्य मधील सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्वांनी मिळून महाराष्ट्र राज्यामधील सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा इंगोले वस्ती शाळेला भेट दिली. शाळा संपूर्ण डिजिटल आहे, विध्यार्थ्यांची प्रगती 100% दिसून आली. लोकसहभागातून सर्व मूलभूत भौतिक सुविधा मिळविलेल्या आहेत. विध्यार्थी आनंदाने शिकतात, शिक्षक नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत असल्याचे सोशल माध्यमातून ऐकून पाहुन होतो आज प्रत्यक्ष पाहुन खुप आनंद झाला. अशी प्रतिक्रीया भीमण्णा गुडले यांनी दिली.

X