आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka : Agitation Against CAA Turns Into Violence; Protesters Set The Truck On Fire

सीएएविरोधातील आंदोलनाला कर्नाटकात हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवला ट्रक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याविरोधात फलक झळकावण्यात आले. - Divya Marathi
बंगळुरूमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याविरोधात फलक झळकावण्यात आले.
  • कर्नाटकमध्ये आंदोलन तीव्र, शहा १८ जानेवारीला हुबळीत
  • मोर्चा संपल्यानंतर जमाव झाला हिंसक

मंगळुरू - कर्नाटकमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)  विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी ट्रकला पेटवले. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. 

पोलिसांनी सांगितले की, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्यासाठी डीसीपीसीने रविवारी मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यानंतर काही अज्ञात लोकांनी एक ट्रकला आग लावली. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला  होता. मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून चौकशी सुरु केलेली आहे. दरम्यान सीएए आणि एनआरसीच्या विरोधात केलेल्या आंदोलनांमध्ये बंगळुरूमध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळुरूमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तसेच या वेळी आंदोलकांनी सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामध्ये यापूर्वीही अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.काँग्रेस राबवणार ‘गो बॅक अमित शहा’ अभियान 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱ्याच्या वेळी धारवाड जिल्हा काँग्रेसच्या वतीने गो बॅक अमित शहा हे अभियान राबवण्यात येणार आहे.  तसेच या वेळी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात ये‌ईल. अमित शहा १८ जानेवारीला हुबळीमध्ये येणार आहेत. येथे ते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करतील. धारवाड ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गो बॅक अमित शहा या अभियानाला मंगळवारपासून सुरुवात करणार आहोत. केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या नावावर नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...