आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले- आरोपीला निर्घृणपणे ठार करा, जेडीएस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर फोनवर कुमारस्वामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेडीएस कार्यकर्ते प्रकाश यांच्यावर चार अज्ञात बाइकस्वार हल्लेखोरांनी गोळी झाडली.

कुमारस्वामींची नंतर सारवासारव- मी असा कोणताही आदेश नाही दिला.  त्या वेळी मी काही बोललो असेन, मी भावुक झालो होतो.

 

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जेडीएसचे स्थानिक नेते प्रकाश (50) यांच्या हत्येनंतर त्यांनी फोनवर म्हटले- हत्या करणाऱ्याला निर्घृणपणे ठार करा. तथापि, नंतर मुख्यमंत्री जवळच्यांना स्पष्टीकरण देताना म्हणाले की, ही एक भावुक प्रतिक्रिया होती. कुमारस्वामींनी असा कोणताही आदेश दिला नाही.

 

#WATCH Karnataka CM HD Kumaraswamy caught on cam telling someone on the phone 'He(murdered JDS leader Prakash) was a good man, I don't know why did they murder him. Kill them (assailants) mercilessly in a shootout, no problem. (24.12.18) pic.twitter.com/j42dqiRs0a

— ANI (@ANI) December 25, 2018

 

'मला माहिती नाही, त्याला कोणी मारले...'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुमारस्वामी म्हणाले- "ते (प्रकाश) खूप चांगले होते. मला माहिती नाही की, त्यांना कोणी मारले. त्या अधर्मीला निर्घृणपणे ठार करा. यात कोणतीही अडचण नाही.''


यानंतर कुमारस्वामी असेही म्हणाले की, "एक मुख्यमंत्री असल्याने मी असा कोणताही आदेश देऊ शकत नाही. जरी मी काही बोललो असेन, तर मी त्या वेळी भावुक होऊन बोललो होतो. पक्ष कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, संशयिताचा हत्येच्या आणखी दोन प्रकरणांतही तपास सुरू आहे. ते तुरुंगात होते आणि दोन दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले होते. यानंतर त्यांनी आणखी एका व्यक्तीची हत्या केली.''

 

#BIGNEWS: #Karnataka CM @hd_kumaraswamy orders shootout of killers of #JDS leader Honnagere Prakash. CM said, "kill them mercilessly, there's no problem." pic.twitter.com/KOdvJrWR4s

— NEWS9 (@NEWS9TWEETS) December 24, 2018

 

प्रकाश जनता दल (सेक्युलर) चे नेते होते. त्यांच्या पत्नी जिल्हा पंचायतच्या माजी अध्यक्षा होत्या. अज्ञात आरोपींनी सोमवारी प्रकाश यांची ते कारने  मद्दूर येथे जात असताना हत्या केली.

रिपोर्ट्सनुसार- ही हत्या दिवसाढवळ्या करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, आरोपींनी कारचे दार उघडून गोळीबार केला. प्रकाश मांड्यामध्ये मैसूर रोडवर आपल्या कारमध्ये होते, तेव्हा चार बाइकस्वारांनी त्यांची गोळ्यांनी चाळणी केली. प्रकाश यांना गंभीर अवस्थेत मांड्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एमआयएमएस) मध्ये नेण्यात आले, येथे त्यांचा मृत्यू झाला.

 

मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) स्टेटमेंट जारी करून घटनेवर दु:ख व्यक्त केले आणि या प्रकरणच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कुमारस्वामी म्हणाले- "प्रकाश पक्षाच्या प्रामाणिक नेत्यांपैकी एक होते. पोलिसांना आवश्यक पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.'' 

 

बातम्या आणखी आहेत...