आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: 500 रुपयांची उधारी दिली नाही, म्हणून मित्राच्या पत्नीला पळवून नेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव (कर्नाटक) - कर्नाटकात कर्ज न फेडल्याने मित्राच्या पत्नीशी लग्न केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बेळगावात मंगळवारी एका व्यक्तीने डेप्युटी कमिश्नरांच्या ऑफिसबाहेर धरणे दिले. पीडित पतीचा आरोप आहे की, त्याच्या मित्रानेच त्याच्या पत्नीचे अपहरण केले आणि नंतर तिच्याशी लग्नही केले. पीडित पतीने प्रशासनाला मागणी केली आहे की, त्याची पत्नी परत मिळवून दिली जावी. 


याप्रकरणी कथितरीत्या जे कारण समोर आले आहे, ते खूपच धक्कादायक आहे. पीडित पतीचे म्हणणे आहे की, त्याला 500 रुपयांची उधारी फेडता आली नाही, म्हणून त्याच्या मित्राने त्याच्या पत्नीला पळवून तिच्याशी लग्न केले. तथापि, सूत्रांनुसार या कहाणीत अनेक कारणे आहेत.

 

हॉटेलमध्ये काम करताना झाले मित्र
बेलहोंगल तालुक्यातील मुराकीभावी गावातील बसवराज कोनान्नवर आणि रमेश हुक्केरी हे दोघे शाहपूरच्या एका हॉटेलमध्ये काम करताना एकमेकांचे मित्र बनले. बसवराजची पत्नी पार्वतीही याच हॉटेलमध्ये काम करायची. ती आणि रमेशही एकमेकांच्या संपर्कात होते. 2011 मध्ये बसवराज आणि पार्वतीने लग्न केले. त्यांना एक 3 वर्षांची मुलगीही आहे.


2 महिन्यांपूर्वी अपहरण करून लग्न केल्याचा आरोप
बसवराजचा आरोप आहे की, 2 महिन्यांपूर्वी रमेशने पार्वतीचे अपहरण केले आणि कर्ज न फेडल्यामुळे लग्न केले. बसवराजच्या म्हणण्याप्रमाणे पार्वती त्याच्या दुसऱ्या बाळाची आई बनणार होती. दुसरीकडे, लग्नानंतर रमेशने पार्वतीला तिच्या माहेरी पाठवले.

 

'माझ्याकडे परतायचे नाही पार्वतीला' 
बसवराज म्हणतो की, पत्नीचे अपहरण झाल्यानंतर त्याने ताबडतोब तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच गांभीर्याने घेतले नाही. मंगळवारी बसवराजने म्हटले की, मागच्या दोन महिन्यांपासून पार्वती रमेशसोबत राहत आहे आणि आता तिला परत यायचे नाही. त्याने एक ऑडियो क्लिपसुद्धा दाखवली आहे, ज्यात रमेश कथितरीत्या त्याला पार्वतीपासून दूर राहण्याची धमकी देत आहे.

धरणे देण्याआधी बसवराजने शहर पोलिस आयुक्त राजप्पा यांची भेट घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी मदतीची याचना केली. आयुक्तांनी याप्रकरणी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...