आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक / काँग्रेसचे सर्वच मंत्र्यांचे राजीनामे, अपक्ष आमदाराने समर्थन परत घेतले; भाजपकडून सत्ता स्थापनेची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू -  कर्नाटक सरकारच्या सर्वच 21 मंत्र्यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारचे संकट आणखी वाढले आहे. आघाडी सरकारला समर्थन देऊन शाबूत ठेवणारे अपक्ष आमदार एच नागेश यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. माध्यमांशी संवाद साधताना भाजप सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना समर्थन देऊ असे म्हटले. सोबतच, देशातील कुठल्याही राज्यात दुसऱ्या पक्षाने सत्तेत राहू नये असे भाजपला वाटते. त्यामुळे, काँग्रेसचे सर्वच मंत्री देखील राजीनामा देणार असल्याचा दावा नागेश यांनी केला. त्यांच्या वक्तव्याच्या अवघ्या काही मिनिटांत इतर मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले. या मुद्द्यावरून लोकसभेत सोमवारी गदारोळ उठला. परंतु, कर्नाटकच्या हालचालींशी आपला काहीच संबंध नसल्याचे भाजपने म्हटले आहे.


भाजप करू शकते सरकार स्थापनेचा दावा
कर्नाटकच्या राजकारणात आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होत असताना दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचे 118 आमदार होते. सरकारच्या 12 आमदारांनी आधीच राजीनामे दिले. त्यानंतर आता अपक्ष आमदार नागेश यांनीही पद सोडले. त्यानंतर 224 सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 113 वरून 106 झाला आहे. राजीनामा देणारे अपक्ष आमदार नागेश भाजपला समर्थन देत असतील तर भाजपला बहुमताचा 106 चा आकडा पूर्ण करणे सहज शक्य आहे.


असे आहे कर्नाटकचे राजकीय नाटक
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसची सत्ता असताना शनिवारी येथील 12 आमदारांनी अचानक राजीनामा दिला. यामध्ये 8 काँग्रेसचे आमदार आहेत. त्या सर्वांनी थेट मुंबईतील हॉटेल गाठले आणि याच ठिकाणी मुक्काम ठोकला. काँग्रेसने आरोप केला की या सर्व आमदारांना भाजपनेच फूस लावून चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणले. सोबतच, भाजपकडून या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे असे आरोपही केला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील या हॉटेल परिसरात जोरदार निदर्शने सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...