आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेसाठी आमदार फोडाफोडीचा खेळ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्नाटकात ७ महिन्यांनंतर पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी आमदारांची फोडाफोडी सुरू झाली आहे. आमदार फोडले जात असल्याचा आरोप सत्तारूढ काँग्रेस-जेडीएस आघाडी व भाजपने एकमेकांवर केला आहे. कर्नाटकाचे मंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, भाजप काँग्रेसच्या ३ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. ते तिघेही सध्या मुंबईत आहेत. मात्र, आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केला आहे. भाजपनेही आपले सर्व १०४ आमदारांना गुरुग्राममधील हॉटेलमध्ये ठेवले आहेत. कर्नाटक विधानसभेत २२४ सदस्य आहेत. पैकी काँग्रेसचे ८०, जेडीएसचे ३७, भाजपचे १०४ व इतर ३ आमदार आहेत.

 

 

कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) व काँग्रेसचे सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना लालूच देऊन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात बातम्यांमुळे चिंतेत आलेल्या काँग्रेसने सोमवारी बैठक घेतली. त्यात सरकार पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली.  


उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी बैठक घेतली. बैठकीत सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत वरिष्ठ मंत्री, समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या सहभागी झाले होते.  


कर्नाटकात विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांवर मतदान झाले होते. त्यात भाजपला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ७८ व जनता दल (सेक्युलर) ला ३८ जागा मिळाल्या होत्या. १०४ आमदारांच्या जोरावर येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. परंतु बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, जनता दल व इतर एकत्र आले आणि जनता दलाचे नेते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले. आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.

 

या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने बैठक घेतली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका मंत्र्याने सांगितले की, संबंधित जिल्हा अध्यक्षांना त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.  त्या त्या जिल्हाध्यक्ष आपल्या भागातील आमदार भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...