Home | National | Other State | karnataka mother beating her daughter on camera

आईने मुलीच्‍या मानेवर पाय ठेवत केली मारहाण, नंतर केस ओढून जमिनीवर फरफटले, आजूबाजूचे पाहत राहिले तमाशा, कोणाचीही मध्‍ये पडण्‍याची हिंमत झाली नाही

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 12:00 AM IST

कारवार जिल्‍ह्यातील एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक आई आपल्‍या 12 वर्षांच्‍या मुलीला निर्दयीपणे मारहाण करताना

  • नॅशनल डेस्‍क, कर्नाटक - कारवार जिल्‍ह्यातील एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक आई आपल्‍या 12 वर्षांच्‍या मुलीला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. आजूबाजूला लोकही उभे आहेत. मात्र आईचा राग पाहून कोणीही तिला रोखण्‍याची हिंमत करत नाही. रिपोर्ट्स अनूसार, एका शेजा-याने चोरून हा व्हिडिओ बनवला आह.


    वाचवा..म्‍हणून किंचाळत राहिली मुलगी
    व्हिडिओत दिसत आहे की, मुलीच्‍या मानेवर पाय ठेवत आई तिला निर्दयीपणे मारत आहे. यामुळे मुलीला प्रचंड वेदना होत आहेत. ती आजुबाजूचय लोकांना वाचवण्‍यासाठी विनवत आहे. मात्र आईचा आऊट ऑफ कंट्रोल अवतार पाहून कोणीही पुढे येण्‍यास धजावत नाही. मीडिया रिपोर्ट्स अनूसार, मारहाण करताना आई दारूच्‍या नशेत होती.


    शेजा-याने बनवला व्हिडिओ
    शेजा-याने लपवून हा व्हिडिओ बनविला आहे व नंतर तो राज्‍याच्‍या समाज कल्‍याण विभागाला दाखविला. यानंतर महिलेला अटक करण्‍यात आली. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्‍हायरल होत आहे.

Trending