आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Polical Crisis Yediyurappa Govt Karnataka Speaker JDS & Congress Karnataka

कर'नाटक'/ येदियुरप्पांच्या बहुमत चाचणीपूर्वीच काँग्रेस-जेडीएसचे 11 बंडखोर आमदार अपात्र घोषित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू(कर्नाटक)- विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी रविवारी काँग्रेस-जेडीएसच्या आणखीन 11 बंडखोर आमदारांना अयोग्य घोषित केले. मागील चार दिवसात अध्यक्षांनी 14 वंडखोरांच्या अयोग्यतेवर निर्णय ऐकवला आहे. त्यांनी गुरुवारी तीन आमदारांविरुद्ध कारवाई केली. कर्नाटकमध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणाऱ्या येदियुरप्पांना 29 जुलैला बहुमत सिद्ध करायचे आहे. अध्यक्ष म्हणाले की, सध्या त्यांच्यावर खूप दबाव आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या निगराणीत बहुमत चाचणी करण्याची विनंती केली आहे.


रमेश कुमार म्हणाले, "येदियुरप्पा यांनी मला सांगितले की, सोमवारी आपल्या देखरेखीत बहुमत चाचणी करावी. फायनांस बिलदेखील 31 जुलैला पास व्हायला हवे, त्यामुळे मी सर्व आमदारांना बहुमत चाचणीदरम्यान उपस्थित राहण्यास सांगतो. अध्यक्ष म्हणून माझ्यावर खूप दबाव आहे. या सर्व गोष्टीमुळे मी खूप तणावात आलो आहे,"


जेडीएस विरोधी पक्षातच असेल
भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की, रमेश कुमार यांना पद सोडण्यास सांगितले आहे, जे पारंपारीकरित्या सत्तेत असलेल्या कोण्या एका व्यक्तीकडे असायला हवे. जर त्यांनी असे केले नाही तर, त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला जाईल. दुसरीकडे जेडीएसने मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांना समर्थन देण्यास नकार दिला आहे. जेडीएसने सांगितले की, ते विधानसभेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल. कर्नाटच्या मुख्यमंत्रीपदावर चौथ्यांना विराजमान झाल्यानंतर 29 जुलैला ते बहुमत सिद्ध करतील.