आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक राजकारण : बंडखोर आमदारांवर निर्णय घेऊन कळवा - सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटकात सरकार वाचवण्याचे आणि पाडण्याचे राजकीय नाट्य गुरुवारीही चालू होते. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्याबाबत रात्री १२ वाजेपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश विधानसभा सभापती रमेश कुमार यांना दिले. काय निर्णय घेतला ती माहिती शुक्रवारी सकाळी न्यायालयात सादर करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 


बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यानंतर काही तासांतच स्वत: रमेश कुमार यांनी याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयास हा आदेश देण्याचा अधिकारच नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 
दिवसभरात झालेल्या घडामोडींत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने  बंडखोर आमदारांना सायंकाळी ६ पर्यंत सभापतींची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार हे आमदार विमानाने तातडीने बंगळुरूत पोहोचले. सभापतींची त्यांनी भेटही घेतली. मात्र, राजीनामे मंजूर करण्यास सभापतींनी नकार दिला. आमदारांनी दबावापोटी तर राजीनामे दिले नाहीत ना, हे तपासले जाईल, असे सभापती म्हणाले. दरम्यान, शुक्रवारचा दिवस या राज्यातील राजकीय पेच सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...