आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Trust Vote Today JDS Congress HD Kumaraswamy Government Floor Test Live News

कुमारस्वामींना एका दिवसाचा दिलासा; कामकाज स्थगित, भाजपेचे आमदार रात्रभार विधानसभेत आंदोलन करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकारविरुद्ध अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान भाजप नेत्यांनी आरोप केला की सत्ताधारी नेते लांबलचक भाषणे देऊन प्रक्रियेला विलंब करत आहेत.अशा स्वरुपाची भाषणे प्रचारसभांमध्ये दिली जातात. माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी देखील लांब भाषणांवर आक्षेप नोंदवला. याच दरम्यान, काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्या अनुपस्थितीने सभागृहात गदारोळ निर्माण झाला. पाटील यांच्यातर्फे एक पत्र मिळाले. त्यामध्ये आजारपणासाठी मुंबईत उपचारासाठी जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर काँग्रेसने भाजपवर आरोप केला की त्यांनीच आमचे आमदार पळवले आहे. संबंधित आमदाराचे अपहरण झाले असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावरून विधानसभा अध्यक्षांनी गृहमंत्रालयाला 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यातच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना सांगितले, की त्यांनी अविश्वास ठरावावर आजच विचार करावा. कारवाईला स्थगिती मिळाल्यानंतर सर्व भाजप आमदारांनी विधानसभेतच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीए येदियुरप्पा यांनी 100 टक्के आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, काँग्रेसकडे 100 आमदार सुद्धा नाहीत आणि आमच्याकडे 105 आमदारांचे समर्थन आहे. अविश्वास ठरावात कुमारस्वामी सरकार अपात्र ठरणार असेही ते म्हणाले. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या 16 आमदारांनी अचानक राजीनामा दिला. तेव्हापासूनच एचडी कुमारस्वामी यांचे सरकार संकटात सापडले आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत सत्ता स्थापित करू असा दावा भाजपकडून केला जात आहे.


अशी आहे आकडेवारी
काँग्रेस-जेडीएसच्या 15 बंडखोर आमदारांनी मुंबईत मुक्काम ठोकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बंडखोर आमदारांना सभागृहात हजेरीसाठी दबाव टाकला जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे, ते सभागृहात येणारच नाहीत. त्यातच काँग्रेसचे आणखी 2 आणि बसपच्या एका आमदारासह इतर 2 अपक्ष आमदार सुद्धा गायब आहेत. एकूणच स्पीकर आणि 20 आमदारांना वगळल्यास सभागृहातील एकूण सदस्यसंख्या 224 वरून 203 होईल. अशात बहुमत सिद्ध करण्यासाठी 102 आमदारांचा पाठिंबा लागेल. परंतु, कुमारस्वामी सरकारकडे आता केवळ 98 आमदार उरले आहेत. तर भाजपकडे 105 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत या राज्यात भाजपचे पारडे जड दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...