National / कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मैसूर विमानतळावर कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली, व्हिडिओ झाला व्हायरल

तो कार्यकर्ता सिद्धारमैया यांना एका अधिकाऱ्याशी बोलण्यास सांगत होता

दिव्य मराठी वेब

Sep 04,2019 04:43:00 PM IST

बंगळुरू(कर्नाटक)- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या कानशिला लगावली आहे. घटना आज(बुधवार) सकाळी मैसूर विमानतळावर घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सिद्धारमैया यांच्या वागणुकीची सर्वच स्तरातून निंदा होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हा स्थानिक नेता सिद्धारमैया यांना एका अधिकाऱ्याला फोनवर बोलण्यास सांगत होता. या गोष्टीवरुन सिद्धारमैया नाराज झाले. घटनेच्या व्हिडिओत काँग्रेस नेते सीएम इब्राहिम आणि कर्नाटक महिला कांग्रेसच्या अध्यक्ष पुष्पा अमरनाथदेखील दिसत आहेत.

काही महिन्यांपूर्वी महिलेसोबत गैरवर्तन केले होते
सिद्धारमैया यांनी यावर्षी जानेवारीमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केले होते. त्या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला होता. व्हिडिओत सिद्धारमैया मैसूरच्या शिलान्यास कार्यक्रमात महिलेकडून माइक हिसकाऊन घेताता आणि जबरदस्तीने तिला खुर्चीवर बसवत असल्याचे त्यात दिसले होते.

X
COMMENT