आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलासारखे दिसण्यासाठी कार्तिक आर्यनने घटवले आठ किलो वजन..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कार्तिक आर्यन लवकरच 'लव्ह आज कल २'मध्ये दिसेल. नेहमीप्रमाणे या चित्रपटासाठीही त्याने आपल्या लुकमध्ये विशेष बदल केला आहे. वस्तुत: दिग्दर्शक इम्तियाज अलीने त्याला 'लव्ह आज कल २'मध्ये घेण्यापूर्वीच आठ किलो वजन कमी करावे लागेल, असे सांगितले होते. कार्तिकनेही इम्तियाजची हा अट मानन्य केली आणि लगेच वजन कमी करण्यास सुरुवात केली. चित्रपटामध्ये तो रघु आणि वीरचे पात्र साकारत आहे. रघुचे पात्र ९० च्या दशकातील असून वीर आधुनिक युगातील मुलगा आहे. रघुचे पात्र शाळेत जाणारा मुलगा आहे. त्यामुळे कार्तिकने आपल्या केशरचनेतही बदल केला आहे, जेणेकरून तो शाळकरी मुलासारखा दिसेल. कार्तिकने या पात्रासाठी कठीण डायटिंग केली आणि जवळपास आठ किलो वजन कमी केले. त्याने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटोदेखील शेअर केला. त्यात तो आपल्या इतर सहकलाकारांसोबत शाळेच्या गणवेशात पोज देताना दिसत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...