• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Karthik Aryan sticks cake on Ananya Pandey's face, the actress also took revenge, did something like this...

Bollywood / कार्तिक आर्यनने लावला अनन्या पांडेच्या चेहऱ्यावर केक, अभिनेत्रीनेही घेतला बदला, केले असे काही.... 

कार्तिक आणि अनन्याचा आगामी चित्रपट 'पती पत्नी और वो' चे शूटिंग पूर्ण झाले आहे

Sep 09,2019 03:54:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा आगामी चित्रपट 'पती पत्नी और वो' चे शूटिंग लखनऊमध्ये पूर्ण झाले आहे. 'पती पत्नी और वो' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर स्टार कास्टने सेटवर केक कापून खूप मस्ती केली. आता यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन, अनन्या पांडेच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहे. मात्र अभिनेत्रीने देखील नंतर त्याच्या चेहऱ्यावर केक लावला. अनन्या पांडेने हा व्हिडीओ पोस्ट करून कार्तिक आर्यनसाठी लिहिले, 'बदला कधीच गोड नसतो कार्तिक आर्यन...ट्रेडिशनल जेवण आणि एवढ्या प्रेमासाठी धन्यवाद लखनऊ.'

अनन्या पांडेच्या या पोस्टवर लोक खूप कमेंट करत आहेत. कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडनेकर यांचा चित्रपट 'पती पत्नी और वो' रोमँटिक कॉमेडी ड्रामावर आधारित आहे, ज्याचे दिग्दर्शन मुदस्सर अजीजने केले आहे.

X