आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karthik Aryan's Decision To Raise The Fees, Will Now Take Rs 7 Crore For A Movie

कार्तिक आर्यनने घेतला फीस वाढवण्याचा निर्णय, आता एका चित्रपटासाठी घेणार इतकी रक्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'प्यार का पंचनामा' चित्रपटाने करिअरची सुरुवात करणाऱ्या कार्तिक आर्यनने चित्रपटांचा वाढता ग्राफ पाहून फीस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार, कार्तिक आपली फीस 7 कोटी करण्याचा विचार करत आहे. सध्या तो  'भूल भुलैया 2'  आणि 'लव्ह आजकल 2' मध्ये  या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त त्याचा  'पति, पत्नी और वो' हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

'सोनू के टीटू की स्वीटी' च्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यनने वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका सूत्राने सांगितले की, कार्तिक आतापासून एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये फीस घेण्याचा विचार करत आहे. सूत्रांनुसार,  फिल्ममेकरला त्याच्यावर पैसा खर्च करण्याबद्दल विचार करावा लागणार नाही याबाबत कार्तिक आश्वस्त आहे.

रिपोर्टनुसार, मागील दीड वर्षांमध्ये कार्तिकच्या प्रसिद्धीमध्ये खूप वाढ झाली आहे. यावेळी तो त्या टप्प्यावर आहे, जेव्हा प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातात. खास गोष्ट ही आहे की, सुरुवातीच्या काळात त्याचे 'कांची', 'आकाशवाणी' यांसारखे चित्रपट आपटल्यानंतरही कार्तिकने अनेक मोठे प्रोजेक्ट आपल्या नावे करून घेण्यात यश मिळवले होते. 

बातम्या आणखी आहेत...