आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्तिक आर्यन आणि किआराच्या 'भूल भुलैया 2'च्या शुटिंगला सुरुवात, या दिवशी रिलीज होणार फिल्म

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी - Divya Marathi
कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी

बॉलीवूड डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी स्टारर 'भूल-भुलैया 2' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कार्तिक आर्यनने सेटवरचा एक फोटो शेअर करुन शुभारंभ!  #BhoolBhulaiyaa2 असे ट्वीट केले आहे.  कार्तिकने शेअर केलेल्या फोटोत त्याच्यासोबत किआरा दिसत असून तिच्या हातात क्लॅप बोर्ड दिसतोय. फोटोत कार्तिक ब्लू हुडी आणि किआरा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आहेत. 

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनीही सोशल मीडियावरुन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचे सांगितले.  हा चित्रपट अक्षय कुमार स्टारर हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया'चा सीक्वेल आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 31 जुलैला रिलीज होणार आहे.

अनीस बज्मींनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अनीस बज्मी आणि भूषण कुमार यांच्यासोबतचाही सेटवरचा कार्तिक आणि किआराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...