आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी अमावास्या, या दिवशी हनुमानासमोर दिवा लावून करावा हनुमान चालीसा पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 26 नोव्हेंबरला कार्तिक मासातील अमावस्या आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या महिन्यातील अमावास्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी करण्यात आलेल्या पूजेचे फळ लवकर प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, अमावास्येला कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात.

  • स्नान आणि दान करण्याची परंपरा

या महिन्याच्या अमावास्येला एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे. स्नान केल्यानंतर गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावे. शक्य असल्यास वस्त्रही दान करू शकता.

  • पितरांसाठी धूप-ध्यान

मंगळवारच्या अमावास्येला भौमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी.

  • मंगळवारी करावी हनुमानाची पूजा

मंगळवार आणि अमावास्या योगामध्ये हनुमानाची विधिव्रत पूजा करावी. पूजेमध्ये हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हनुमान चालीसाचे पाठ करावेत. शक्य असल्यास सुंदरकांडचेही पाठ करू शकता.

  • मंगळ ग्रहाची पूजा करावी

मंगळवारी मंगळ ग्रहाचीही पूजा केली जाते. मंगळ ग्रहाची पूजा शिवलिंग रूपात केली जाते. यामुळे या दिवशी शिवलिंगावर लाल फुल, लाल गुलाल अर्पण करावे. मसुराची डाळ अर्पण करावी.