आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kartik, Aryan And Jhanwi Kapoor Appear In Karan's 'Dostana 2', But They Will Not Do Romantic Scene

करणच्या 'दोस्ताना २'मध्ये दिसतील कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर, पण करणार नाहीत रोमँटिक सिन   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे मात्र आता आणखी एका चित्रपटाशी त्याचे नाव जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच करण जोहरने 'दोस्ताना' चित्रपटाचा सिक्वल करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या सिक्वलमध्ये आता जुने कलाकार म्हणजेच अभिषेक बच्चन, जॉन इब्राहिम आणि प्रियांका चोप्रा हे दिसणार नाहीत तर करणने या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांची निवड केली आहे. 

 

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर जरी या चित्रपटात असले तरी ते या चित्रपटात रोमँटिक सिन करताना दिसणार नाहीयेत. पिंकव्हिला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट 'दोस्ताना 2' मध्ये कार्तिक आर्यन आणि जनवी कपूर कपल म्हणून नाही तर भाऊ बहीण बनून ऑडिएंसला इंटरटेंन करणार आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये आणखी एक लीड कॅरेक्टर असेल, जे या दोघांचे लव्ह इंटरेस्ट म्हणून चित्रपटात दिसेल. या तिसऱ्या लीड कॅरेक्टरचा धर्मा प्रोडक्शन शोध घेत आहे आणि ते एक नवा चेहरा लॉन्च कारण्याच्याबी विचारात आहेत. असे झाले तर, कार्तिकला पहिल्यांदा गे कॅरेक्टर प्ले करताना ऑडिएंस पाहणार आहे. कॉलिन डिसून्हा 'दोस्ताना 2' चे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज होऊ शकतो.  

बातम्या आणखी आहेत...