• Home
  • Gossip
  • Kartik Aryan bought the flat for 1.60 crores, a flat, where he lived as a paying guest several years ago.

Bollywood / कार्तिक आर्यनने 1.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला तो फ्लॅट, जिथे काही वर्षांपूर्वी तो पेइंग गेस्ट म्हणून राहिला होता

551 चौरसफूट आहे फ्लॅटचा एरिया... 

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 05:05:28 PM IST

बॉलिवूड डेस्क : 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' सारख्या चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता कार्तिक आर्यनने मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, कार्तिकने तोच फ्लॅट खरेदी केला आहे ज्यामध्ये तो वर्षांपूर्वी पेइंग गेस्ट म्हणून राहात होता. रिपोर्ट्सनुसार, यासाठी कार्तिकने 1.60 कोटी रुपये मोजले आहेत. सोबतच 9.60 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटीचे देखील दिले आहेत.

551 चौरसफूट आहे फ्लॅटचा एरिया...
हा फ्लॅट यारी रोड येथील राजकिरण को-ऑप हाउसिंग सोसाइटीमध्ये आहे. याचा एकूण एरिया 551 चौरसफूट सांगितले जात आहे. यामधून 459 चौरसफूट कार्पेट एरिया आहे. फ्लॅट बिल्डिंगच्या पाचव्या फ्लोअरवर आहे. रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, कार्तिकने ही प्रॉपर्टी याचवर्षी मेमध्ये खरेदी केला आहे. पेपर्समध्ये त्याची आई माला तिवारीचे नावदेखील सामील झाले आहे. यासोबतच त्याचा स्थायिक पत्ता ग्वालियर दाखवला गेला आहे.

दोन चित्रपटांवर काम करत आहे कार्तिक...
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर बॅक टू बॅक दोन सुपरफिट चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी' (2018) आणि 'लुका छुपी' (2019) दिल्यानंतर कार्तिक दोन चित्रपटांवर काम करत आहे. एक आहे डायरेक्टर मुदस्सर अजीजचा 'पती पत्नी और वो', जो याचवर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दुसरा चित्रपट इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात बनत आहे, ज्याचे टायटल अद्याप अनाउंस केले गेलेले नाही. पण हा 'लव्ह आज कल' (2009) चा सीक्वल असल्याचे सांगितले जात आहे. 2020 मध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटामध्ये कार्तिकसोबत सारा अली खान लीड रोलमध्ये दिसणार आहे.

X
COMMENT